भारतीय जनता पार्टी, सासवड शहर यांच्यावतीने नागरिकांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण निवेदने सादर सासवड प्रतिनिधी:सासवड येथे ३० जुलै रोजी भारतीय जनता पार्टी, सासवड शहर यांच्यावतीने सासवड शहरातील नागरिकांच्या हितासाठी आणि शहराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहेत. आज, सासवड शहरातील अपघातग्रस्त क्षेत्रांबाबत उपाययोजना राबवण्यासाठी, तसेच शहरात सिग्नल बसवण्याबाबत तातडीने कारवाई करण्यासाठी आणि तहसील कार्यालयातील जुन्या कागदपत्रांच्या स्कॅनिंगदरम्यान गहाळ होण्याच्या समस्येवर उपाय करण्यासाठी, संबंधित अधिकाऱ्यांना निवेदने सादर करण्यात आली.या संदर्भात, भारतीय जनता पार्टी, सासवड शहर यांच्यावतीने, पोलीस उपनिरीक्षक, सासवड पोलीस स्टेशन यांना अपघातग्रस्त, क्षेत्रांबाबत उपाययोजना राबवण्याची विनंती करण्यात आली. तसेच, सासवड शहरात रस्ते सुरक्षिततेसाठी सिग्नल बसवण्याबाबत तातडीने कारवाई करण्याची मागणी मुख्याधिकारी, सासवड नगरपरिषद यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. याशिवाय, तहसील कार्यालयात जुन्या कागदपत्रांचे स्कॅनिंग करताना होणारी गहाळ होण्याची समस्या रोखण्यासाठी तहसीलदार, तहसील कार्यालय यांना निवेदन सादर करण्यात आले.या प्रसंगी भारतीय जनता पार्टी, सासवड शहराचे अध्यक्ष आनंद जगताप, उपनगराध्यक्ष अजित जगताप, भाजपा राज्य परिषद सदस्य शैलेश तांदळे, मध्य हवेली अध्यक्ष धनंजय कामठे, मयूर जगताप, जयेंद्र निकम, संतोष जगताप, तुषार जगताप, राहुल भोंडे, उदयराज जगताप, ओंकार महागांवकर, मयूर महागांवकर, इ. उपस्थित होते.भारतीय जनता पार्टी, सासवड शहर यांच्यावतीने सासवड शहरातील नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि शहराच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. यापुढेही नागरिकांच्या हितासाठी अशा प्रकारच्या उपाययोजना आणि कारवाईसाठी पक्ष सक्रिय राहील.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments