Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यात ग्रामगौरव प्रतिष्ठानच्या माध्यमातून पर्यावरण जनजागृती कार्यक्रम... सासवड प्रतिनिधी: जागतिक निसर्ग संवर्धन दिवस व नाग पंचमीच्या निमित्ताने पुरंदर तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयात पर्यावरण जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन 21जुलै ते 28जुलै या कालावधीत करण्यात आले होते. पाणी पंचायतच्या ग्राम गौरव प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या उपक्रमात २६ शाळांतून सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला निसर्ग संवर्धन विषयक मार्गदर्शन, विषारी व बिन विषारी साप, त्यांच्या विषयी माहिती, घ्यावयाची काळजी, मानव व साप संघर्षावर उपाय, सापांबद्दल समज, गैरसमज व शंका निरसन अशा स्वरूपातील हा उपक्रम खूपच यशस्वी ठरला. प्रतिष्ठानच्या या उपक्रमात वाघीरे महाविद्यालय, इला फाऊंडेशन, स्वराज्य संस्था, महाराष्ट्र वन विभाग आदी संस्थानी मोलाचा वाटा उचलला. या विविध संस्थांमधीलराजकुमार पवार, ऋषिकेश जगताप, योगेश मगर,प्रशांतबोरावके, सागर भोंडे, शुभम ठोंबरे, दौलत कुंभार, मानसी नाईलकर यांनी या उपक्रमात बहुमोल माहिती देऊन विद्यार्थ्यांस निसर्ग संवर्धन करण्याची शपथ दिली.

Post a Comment

0 Comments