शेतरस्ते अडविल्यास फौजदारी गुन्हे दाखल करावेत; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सासवड प्रतिनिधी: राज्यातील सर्व शिवपाणंद रस्ते आणि शेत रस्त्यांचे हदद निश्चित करून, त्यांची कामे दर्जेदार रित्या पूर्ण करावीत, अशा सूचना प्रशासनाला देतानाच, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेत रस्ते बंद करणाऱ्या वर महसूल प्रशासनामार्फत फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. शिव पाणंद आणि शेत रस्ते समृद्ध करण्याबाबत, पब्लिक डोमेनच्या माध्यमातून, नागरिकांच्या सूचना मागविण्यात आल्या होत्या, त्या अनुषंगाने बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी मंत्रालयांमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पाणंद रस्ते सार्वजनिक वही वाटांच्या रस्त्यांच्या मोजणी आणि पोलीस संरक्षणासाठी असलेली फी बंद करण्याचा विचार करण्यात येईल, असेही सांगून बावनकुळे म्हणाले की, अशा रस्त्यांच्या नंबरींगचे सर्वेक्षण करून, नंबरिंग हटवणाऱ्या वर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, रस्त्याच्या प्रकरणी तहसीलदारांच्या निर्णयावर, उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अपील केल्यानंतर,त्यांनीच अंतिम निकाल देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे, सांगून बावनकुळे यांनी शेत रस्त्यांचा उल्लेख झाल्याशिवाय, वाटप पत्र मंजूर करण्यात येऊ नये, यासाठी ही शासन सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments