Hot Posts

6/recent/ticker-posts

आचार्य अत्रे यांच्या आदर्शांचा स्वीकार करुन विद्यार्थ्यांनीस्वतःला घडवावे - प्रा सुधीर गाडे सासवड प्रतिनिधी: सासवड ही साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांची जन्मभूमी आहे त्यामुळे येथील विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन स्वतःला घडवावे असे प्रतिपादनआचार्य अत्रे यांचे गाढे अभ्यासक प्रा सुधीर गाडे यांनी केले आहे. सासवड येथील आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानव सासवड साहित्य परिषद शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अत्रे साहित्य लेखन, वाचन, परीक्षण अंतर्गत राबवलेल्या उपक्रमाच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात प्रमुखअतिथी म्हणून ते बोलत होते. सासवडच्या वाघीरे विद्यालयातील अत्रे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमासविद्यालयाचे प्राचार्य दत्ताराम रामदासी, उपप्राचार्य शंतनू सुरवसे, साहित्य परिषदेचे अध्यक्ष अँड दिलीप निरगुडे उपस्थित होते. उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व यशोगाथा पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले. आपल्या प्रमुख मनोगतात गाडे यांनी अत्रे यांच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकत मुलांना उत्तुंग स्वप्ने पाहण्याचा आणि ती सत्यात उतरवून यशस्वी होण्याचा सल्ला दिला. सध्याचर्चेत असलेल्या ए आय (कृत्रिम बुद्धीमत्ता) यावरही त्यांनी उत्तम प्रबोधन केले.विद्यार्थ्यांच्यात वाढणाऱ्या आत्महत्या यावर त्यांनी उपस्थित मुलांना उत्तम मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष व उपक्रमाचे आयोजक सतीश पाटील यांनी प्रास्ताविकातून उपक्रमाचा उद्देश, सहभाग या विषयावर माहिती दिली प्राचार्य रामदासी, ॲड दिलीप निरगुडे याच बरोबर स्पर्धक म्हणून उपस्थित असलेले डॉ सरला जोशी, रेखा चौधरीसाक्षी खैरे, डॉ सुभाष तळेकर ऐश्वर्या भुजबळ, जय भोईटेआदींनी यावेळी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमास ॲड अण्णासाहेब खाडे, दिलीप वारे, केशव काकडे, रमेश कानडे, प्रा ज्ञानदेव कोराळे, प्रा संतोष आटोळे , सदानंद करंदीकर, बाळासाहेब कुलकर्णी यांसह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. हेमंत ताकवले यांनी सूत्र संचालन केले. बंडूकाका जगताप यांनी मान्यवरांचे स्वागत केले तर प्रा संदिप टिळेकर यांनी आभार प्रदर्शन केले.

Post a Comment

0 Comments