ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही: माजी खासदार समीर भुजबळ सासवड प्रतिनिधी: सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या भाटिया आयोगाच्या अहवालानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात याव्यात, गेली दोन वर्षे आपण न्यायालयांमध्ये लढा देत असून, ओबीसी समाजावर अन्याय होऊ न देता आरक्षण टिकवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे समता परिषदेचे कार्याध्यक्ष व माजी खासदार समीर भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या राज्यव्यापी आढावा बैठका सध्या सुरू असून, याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा, ग्रामीण तसेच महिला आघाडीची संयुक्त बैठक सासवड या ठिकाणी शासकीय विश्रामगृहात पार पडली. यानंतर समीर भुजबळ प्रसारमाध्यमांशी बोलत होते ,ते म्हणाले की, या बैठकीमध्ये जातनिहाय, जनगणने संदर्भातील केंद्र सरकारचा निर्णय ओबीसी आरक्षणाची सद्यस्थिती आणि संघटनेची भविष्यातील भूमिका यावर चर्चा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जात नाही, जनगणने संदर्भात निर्णय घेतला आहे. यामुळे सर्वांची जात नाही, जनगणनेतून आकडेवारी समोर येणार आहे. संघटनेमार्फत महात्मा ज्योतिबा योजनेचा लाभ, शैक्षणिक व राजकीय हक्क सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे, यासाठी विशेष मोहिमा राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संघटना अधिक बळकट करण्यासाठी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, या बैठकीला समता परिषदेचे समीर भुजबळ,मंजिरी घाडगे महिला प्रदेश अध्यक्ष, बापूसो भुजबळ कार्याध्यक्ष, प्रितेश गवळी विभागीय अध्यक्ष, सोमनाथ भुजबळ विभागीय संघटक, रवीभाऊ सोनवणे सरचिटणीस, अनिल लडकत जिल्हाध्यक्ष, निलम होले महिला जिल्हाध्यक्ष, चंद्रकांत गिरमे पुरंदर तालुका अध्यक्ष, दत्ता झुरंगे माजी जि. सदस्य,आबासो भोगळे माजी तालुकाअध्यक्ष, कैलास जगताप जिल्ह्यातील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने आदी उपस्थित होते. बैठकीतील आगामी निवडणुका संदर्भातील रणनीती, संघटनेची कार्यपद्धती आणि यावरही भरपूर प्रमाणात चर्चा करण्यात आली. खानवडी येथे महात्मा फुले यांच्या पुतळ्यासाठी त्या ठिकाणीही भेट देण्यात आली, वीर या ठिकाणची जी घटना घडली होती त्यावरही त्या ठिकाणी चर्चा करण्यात आली व त्या ठिकाणी पुढील पद्धतीने पोलीस स्टेशन या ठिकाणी निवेदन देण्यासाठी सांगण्यात आले अशी सविस्तर माहिती माजी खासदार समीर भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments