Hot Posts

6/recent/ticker-posts

एम.ई.एस इंग्लिश मीडियम स्कूल सासवड प्रशालेमध्ये जागतिक निसर्ग संवर्धन दिन व नागपंचमी सणाचे औचित्य साधून पर्यावरण जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन - सासवड प्रतिनिधी: २९ जुलै २०२५ रोजी सासवड येथील एम.ई.एस इंग्लिश मीडियम स्कूल व पाणी पंचायत खळद यांच्या संयुक्त विद्यमाने नागपंचमी या सणानिमित्त मार्गदर्शन पर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्याख्याते ऋषिकेश जगताप यांनी नागपंचमी सणाचे ग्रामीण भागातील सांस्कृतिक महत्त्व नमूद करताना सापाच्या विविध प्रजातींबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यामध्ये बिनविषारी साप, निमविषारी साप व विषारी साप कसे ओळखावेत तसेच त्यांची शास्त्रीय माहिती, सापाबद्दल समाजामध्ये असणारे गैरसमज व त्यातील तथ्य, सर्पदंश झाल्यानंतर घ्यावयाच्या प्रथमोपचाराची माहिती अगदी प्रात्यक्षिकासहीत सांगितली.प्रशालेचे हितचिंतक व विद्यार्थीहीत डोळ्यासमोर ठेवून नेहमीच मदतीचा हात पुढे करणारे पालक प्रतिनिधी संतोष जगताप यांचे देखील मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे आयोजन मा. मुख्याध्यापिका कल्पना खांडेकर- नागनूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. भाऊसो येळे यांनी सूत्रसंचालन केले तर रुचिरा गार्डी यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

0 Comments