Hot Posts

6/recent/ticker-posts

तोंडल गावच्या सर्वसामान्य नागरिकांनी शाळेला टाळे लावले; दोन वर्षापासून शाळेसाठी पदवीधर शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय त्यामुळे ग्रामस्थांची आक्रमक भूमिका सासवड प्रतिनिधी: तोंडल (ता. पुरंदर) येथील प्राथमिक शाळेला गेली दोन वर्षापासून पदवीधर शिक्षक नसल्याने, विद्यार्थ्यांची खूप गैरसोय झाली आहे. त्यामुळे पालक वर्ग, ग्रामस्थ खूप आक्रमक होऊन, शाळेला टाळे लावले. वीर केंद्रात जिल्हा परिषद शाळा ही एकमेव सातवी पर्यंत वर्ग असणारी शाळा आहे, जिल्हा परिषदेत मॉडेल स्कूल अंतर्गत नुकतीच शाळेची निवड केली असून, जवळपास शाळा सुधारण्यासाठी 64 लाख रुपयांची निधी मंजूर झाला आहे. असे असताना गेली दोन वर्षात शिक्षक शाळेला पदवीधर नाही, सर्व ग्रामस्थांनी मिळून टाळे लावले, या शाळेची इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत 66 पटसंख्या असून, सहावी, सातवीचे 18 विद्यार्थी आहेत, परंतु संच मान्यतेनुसार पाचवी पर्यंत 60 विद्यार्थी असतील ,तर तीन शिक्षक असतात व 26 सातवी ला 21 विद्यार्थ्यांचा वरती विद्यार्थी असतील तर दोन शिक्षक त्या ठिकाणी असू शकतात, परंतु पाचवीपर्यंत 66 विद्यार्थी असूनही, दोनच शिक्षक उपलब्ध आहेत. सहावी व सातवीच्या वर्गात 18 विद्यार्थी आहेत, तर पदवीधर शिक्षक हा आवश्यकता असताना देखील अजून पर्यंत शिक्षक उपलब्ध नाही. याचा परिणाम म्हणून, पालक मुलांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी चिंतेत असून, पालक आपल्या मुलांना जवळच्या पाच किलोमीटर अंतरावरील वीर किंवा नहावी सांडस येथील हायस्कूल मध्ये पाठवत आहेत, याबाबत शाळा समिती कमिटी सरपंच, उपसरपंच, पालक व केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी यांची एकत्रित मीटिंग घेऊन, तोडगा काढण्याचा प्रयत्न केला परंतु, यामध्ये गावकरी यांनी लोकवर्गणीतून एक खाजगी शिक्षक देण्याचे ठरले व एक कायमस्वरूपी पदवीधर शिक्षक देण्याचे ठरले होते. परंतु तसे काही आतापर्यंत झाले नाही पुरंदर पंचायत समितीतील गटशिक्षण अधिकारी डुबल यांच्याकडे सुद्धा वेळोवेळी जाऊन, सुद्धा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे शेवटी ग्रामस्थांनी कंटाळून, शाळेला कुलूप लावण्याचा निर्णय घेतला, तरी या ची पालकांमध्ये संभ्रमावस्था झालेली आहे, तरी पुरंदरचे गटशिक्षण अधिकारी व विस्तार अधिकारी तोंडल गावाला आले नाहीत, पुरंदर तालुक्यातील शेवटचे टोकाचे गाव असल्यामुळे, या ठिकाणी शिक्षक येण्यासाठी तयार होत नाही, असे गटशिक्षण अधिकारी सांगतात. मुलांच्या होणाऱ्या शैक्षणिक गुणवत्ता नुकसानास शासनच जबाबदार आहे, यावेळी सरपंच शरद वनवे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष केशव वनवे, पूजा तुंगतकर, शाम नागरगोजे, कैलास वनवे, शामकांत वनवे चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी, जावेद इनामदार, प्रतीक भोसले, अश्रू वनवे, बळीराम वनवे, तानाजी वनवे, ज्ञानेश्वर वनवे, बबन मोरे, स्वाती वनवे, शिवाजी वनवे, बाळासो बाबर, शिवा वनवे, लक्ष्मी वनवे, राकेश तुंगतकर, चेतन वनवे, रामभाऊ नागरगोजे, गोरख वनवे तसेच तरुण मंडळ हे मोठ्या संख्येने आदी उपस्थित होते. ग्रामस्थांची मागणी शाळेला त्वरित पदवीधर शिक्षक मिळावा, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवले पाहिजे, शिक्षक जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत सर्व ग्रामस्थ आंदोलनावर ठाम आहेत, असा निर्धार ग्रामस्थांनी एक प्रकारे व्यक्त केला, यासाठी आमदार, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष, पत्रकार यांना सर्व हाकिकत सांगून सुद्धा पुरंदरचे गटशिक्षण अधिकारी व विस्तार अधिकारी कुठलीही दखल घेत नाहीत, याला सर्वस्वी जबाबदार हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानिस गटशिक्षण अधिकारी व विस्तार अधिकारी आहेत, असे तोंडल गावच्या ग्रामस्थांनी आपल्या प्रतिक्रिया प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केल्या.

Post a Comment

0 Comments