पुरंदर तालुक्यातील देवडी येथे मोफत लमपी लसीकरण शिबिर व रोग निवारण औषध वाटप सासवड प्रतिनिधी: देवडी येथे श्रीमंत छत्रपती राजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व डॉ. मनोज शिंदे यांच्या प्रयत्नातून मोफत औषध वाटप व लमपी लसीकरण करण्यात आले.यावेळी उपस्थित पशुपालक आणि मिलिंद (भाऊ) गायकवाड अध्यक्ष आणि डॉ. मनोज शिंदे व ग्रामस्थ यांच्या वतीने गोपूजन करून, आजाराबद्दल माहिती देऊन, औषध वाटप करण्यात आले. उत्कृष्ट पशुपालकांना कीट वाटप करण्यात आले, त्यानंतर गावातील आलेल्या जनावरांना मोफत लसीकरण करण्यात आले, यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल बाठे यांनी केले, तर उपस्थितांना मार्गदर्शन डॉ. मनोज शिंदे यांनी व शुभम काळे वेटरीना फार्मासिटिकल्स यांनी केले, पशुपालकांना आवश्यक वाटप करण्यात आलेल्या किट मधील औषधांची माहिती डॉ. शिंदे यांनी करून दिली व पशुपालकांच्या अडचणींचे निदान करून, त्यावर मार्गदर्शन केले. त्यानंतर मिलिंद भाऊ गायकवाड यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या, लागेल ती मदत करण्याच्या आश्वासन दिले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. सभापती दादा बाठे, सरपंच निलेश यादव, बाबू भाटे, डॉ. खंडागळे व डॉ. निकम सुरेंद्र गॅब्रियल व कर्मचारी मयूर व सहकारी पशुपालक विलास बाठे, विलास चोरगे, गोकुळ नाना बाठे, राजेंद्र यादव, विजय भोसले, सुरेश भोसले, सतीश चिव्हे, संपत भोसले, संदीप बोडरे, किरण भंडलकर, अक्षय खाटपे, अनिकेत बाठे, संतोष बाठे, मोहन यादव, महादेव भोसले, गणेश भोसले, मोहन कामठे व ग्रामस्थ उपस्थित होते.आभार प्रदर्शन राकेश बाठे यांनी केले, सूत्रसंचालन जालिंदर काळे यांनी केले, शेतकरी वर्गातून या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments