काळदरी विद्यालयाचा वृक्षारोपण करुन वर्धापनदिन उत्साहात साजरा सासवड प्रतिनिधी: काळदरी येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, सासवड संचलित श्री केदारेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, काळदरी येथे प्राचार्य विजय चिकणे यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री सत्य साई सेवा संघ, पुणे यांच्या सहकार्याने विद्यालयाचा ३५ वा वर्धापन दिन विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, खाऊ वाटप करुन तसेच वृक्षारोपण करुन उत्साहात साजरा करण्यात आला. सासवड येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, सासवड या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व चंदुकाका जगताप यांनी संस्थेचे उपाध्यक्ष विठ्ठल ताकवले गुरुजी यांच्या आग्रहाखातर काळदरी परीसरात या विद्यालयाची स्थापना केली. अनेक नामांकित संस्था या दुर्गम व डोंगराळ भागात विद्यालय सुरु करण्यासाठी धजावत नसताना काळदरी, धनकवडी व दवणेवाडी परीसरातील गरीब, गरजू,कष्टकरी, शेतकरी व सामान्य माणसांच्या मुलांना विशेषतः मुलींना शिक्षण घेता यावे म्हणून या विद्यालयाची श्री केदारेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज या नावाने २७ जुलै १९८९ रोजी स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत स्थापना केली. युवकांचे मन, मेंदू, मनगट व मस्तक सशक्त व्हावे आणि छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या विचारांना चालना देण्यासाठी गेल्या ३५ वर्षापासून पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यासह हवेली आणि सातारा जिल्ह्यातील खंडाळा व वाई या तालुक्यांमध्ये श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, सासवड या संस्थेच्या १८ विद्यालयांच्या माध्यमातून अत्यंत समाधानकारक शैक्षणिक कार्य चालू आहे. असे मनोगत प्राचार्य विजय चिकणे यांनी व्यक्त केले. यावेळी विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी स्व चंदुकाका जगताप यांच्या शैक्षणिक कार्यासोबतच तालुक्यातील शेतकरी, युवक व महिला यांचेसाठी केलेल्या विविध उपक्रमांची आणि विविध संस्थांची उभारणी याविषयीच्या आठवणींना आपल्या मनोगतांमधून उजाळा दिला. काळदरी येथील श्री केदारेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, काळदरी या उपक्रमशील विद्यालयाच्या ३५ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने प्रथमतः संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व चंदुकाका जगताप यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. त्यानंतर श्री सत्य साई सेवा संघ, पुणे यांच्या सहकार्याने पेरु, चिक्कू, वड, पिंपळ यांसह विविध फुलझाडांची २०० रोपे व थिंक शार्प फाउंडेशनच्या वतीने ७५ झाडे विद्यालयातील परीसरात वृक्षारोपण करण्यासाठी उपलब्ध करुन दिली. उपलब्ध सर्व २७५ झाडांचे विद्यालयाच्या परीसरात श्री सत्य साई सेवा संघ, पुणे यांचे ९५ सेवेकरी, काळदरी गावातील ग्रामस्थ, माजी विद्यार्थी यांच्या हस्ते विद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांचे मदतीने वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण झाल्यानंतर सर्वांना श्री सत्य साई सेवा संघ, पुणे यांच्यावतीने आयोजित मिष्टान्न भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमासाठी पुणे परीसरात विविध नामांकित कंपन्यांमध्ये उच्च पदावर कार्यरत असलेले ९० सेवेकरी तसेच विद्यालयातील शिक्षक पांडुरंग दुर्गाडे, संजय भिंताडे, सुनिल घोडके, शिवाजी गोडसे, पांडुरंग जाधव, अशोक भगत, सुनंदा टकले, कविता शेलार, किसनराव राऊत, पूनम कुंभार, यादव यांचेसह मदतनीस प्रमिला घोडके व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या प्रसंगी प्रा. संतोष नवले यांनी सूत्रसंचालन केले तर बाळू पोमणे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments