Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील कोडीत या ठिकाणी अमावस्या निमित्त भाविकांची अलोट गर्दी सासवड प्रतिनिधी: पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्र कोडीत येथे दर्श पिठोरी अमावस्याा निमित्त कोडित येथील श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. भाविक भक्ताचा मुळे परिसर दुमदुमून गेला होता, पहाटे साडेचार वाजता देवाची दही, दूध व पंचामृत आणि अभिषेक करून, पूजा करण्यात आली. सकाळी सहा वाजता पारंपारिक धूप आरती होऊन ,सकाळी 11 वाजता मंदिर प्रदक्षिणा व छबिना उत्साहात पार पडला. दुपारी बारा वाजता श्रीनाथ सेवा ढोल, लेझीम मंडळ समस्त मुकादम भावकी मंडळ व बाळासाहेब यशवंत बडदे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. देवस्थान परिसर फुलाच्या सजावटीने व आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून गेला होता, भाविकासाठी पिण्याचे पाणी, दर्शन बारी, वाहनतळ आदी सुविधा देवस्थान ट्रस्ट कडून उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यावेळी ट्रस्टचे बाळासाहेब अश्रू बडधे, ईश्वर बडधे, सुदाम बडधे, सागर बडधे, उमेश बडधे, मयूर बडधे, संदीप बडधे, संतोष बडधे, राजेंद्र बडधे आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments