Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील किल्ले पुरंदर कडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली सासवड प्रतिनिधी: पुरंदर किल्ल्यावर जाणाऱ्या रस्त्यावर शुक्रवारी( दि. 22) रात्री दरड कोसळली असून, यामुळे नारायण पेठेतून किल्ल्यावर रस्त्यावर चिखल आणि राडारोड झालेला आहे, घटना रात्री घडल्याने, सुदैवाने कोणती जीवित हानी झाली नाही, दरड कोसळल्याची माहिती मिळताच बांधकाम विभाग तसेच पोलिसांनी शनिवारी( दि. 23) रस्त्याची साफसफाई करून रस्ता वाहतूकस सुरळीत केला अशी माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली, गेल्या चार दिवसापासून पुरंदर परिसरामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे, सततच्या पावसामुळे डोंगराळ भागातील मातीची पकड सैल झाल्याने,दरड कोसळण्याचे प्रकार सुरू झालेले आहेत, शुक्रवारी रात्री किल्ल्याच्या मार्गावरील तिसऱ्या टप्प्यात दरड कोसळली दरम्यान, सकाळी किल्ल्यावर जाणाऱ्या नागरिकांना रस्त्यावरील चिखल आणि दगडाचा प्रचंड पसारा दिसून आला याबाबतची माहिती त्यांनी प्रशासनास दिली दरम्यान, पुरंदर किल्ला परिसरात सातत्याने पावसाची हजेरी असल्याने, पर्यटकांनी अनावश्यक प्रवास टाळावा व सदर प्रवास सतकॅने करावा असे आव्हान सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी प्रतिनिधीला ही माहिती दिली.

Post a Comment

0 Comments