पुरंदर तालुक्यातील सासवड नगरपालिकेसाठी नगरपालिका निवडणुकीमध्ये नगरसेवकांची संख्या आता 22; तर इच्छुकांची मोर्चा बांधणीस सुरूवात सासवड प्रतिनिधी: सासवड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकासाठी प्रारूप प्रभाग रचनेला नुकतीच मान्यता मिळाली असून, इच्छुकानी मोर्चे बांधणी सुरू केली आहे, पुणे विभागीय आयुक्तांनी मान्यता दिलेली ही प्रारूप प्रभाग रचना 18 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2025 या कालावधीत नगर परिषदेच्या सूचना फलकावर आणि संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यावर नागरिकाकडून हरकती आणि सूचना मागविण्यात आलेल्या आहेत ,अद्याप एकही हरकत आलेली नाही, यापूर्वी सासवड नगर परिषदेत नऊ प्रभाग होते ,आता ही संख्या वाढून 11 प्रभाग झाली आहे, त्यामुळे नगरसेवकांची संख्या 19 वरून, 22 झाली असून, स्वीकृत सदस्यांची संख्या ही एक ने वाढून तीन होणार आहे. दिवंगत माझी आमदार चंदूकाका जगताप व माजी आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखालील जनमत विकास आघाडीची गेली दोन पंचवार्षिक पालिकेवर सत्ता होती, यापूर्वी स्वर्गवासी चंदूकाका जगताप यांच्या नेतृत्वाखाली पालिकेत सत्ता होती जून 2022 पासून, पालिकेत प्रशासकीय राजवट आहे,संजय जगताप यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केल्याने, आगामी निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखालीच जनमत विकास आघाडी लढणार की, भाजपचे कमळ फुलणार हे पहाणे, महत्त्वाचे ठरले असून, भाजपने सर्व जागावर स्वबळावर निवडणूक लढवण्याची चर्चा चालू आहे, दुसरीकडे आमदार विजय शिवतारे हे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आघाडी करणार की, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन स्वतंत्रपणे उभे करणार याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. संजय जगताप यांच्या पॅनेल मधून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे, महिलांना 50% आरक्षण असल्याने किमान 11 महिला सदस्य असणार आहेतच, अनेकांनी अपक्ष लढण्याची ही तयारी दर्शवली आहे. गेल्या काही वर्षापासून सासवडचा नियोजनबद्ध विकास झाला असून, स्वच्छ सर्वेक्षण अभियानात शहराने अव्वल स्थान पटकावले आहे. वाढत्या शहरीकरणामुळे पुढील 50 वर्षाचा विचार करून, पाणीपुरवठा ऐतिहासिक स्थळांचा विकास आणि पर्यटनाला चालना देण्यासारख्या मुद्द्यावर लक्ष देणे आवश्यक आहे ,मात्र सध्या भुयारी गटार योजना, पाण्यासाठी समांतर वीर योजना आणि घरगुती गॅस लाइन्स यासारखी कामे अर्धवट अवस्थेत आहेत, याबरोबरच मूलभूत सुविधा आणि किरकोळ दुरुस्तीच्या कामासाठी भाजप सध्या प्रशासनाच्या विरोधामध्ये आंदोलन करत आहे हे तरी सध्या पुरंदरमध्ये सवॅसामान्य नागरीक पहात आहेत.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments