पुरंदर तालुक्यामध्ये महाविकास आघाडी एकत्रच लढणार सासवड प्रतिनिधी: पुरंदर तालुका विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शहरात शरदचंद्र पक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस, आम आदमी पार्टी या सर्व पक्षांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आगामी स्वराज्य संस्था निवडणुका एकत्रितपणे लढवण्याचा एक प्रकारे चांगलाच निर्धार केलेला आहे. सासवड येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्ष, कार्यालयात महाविकास आघाडीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकार परिषदेत काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रदीप पोमण, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष अभिजीत जगताप, जिल्हाध्यक्ष उल्हास शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सभापती दत्ता चव्हाण, बबुसाहेब माहुरकर, कार्याध्यक्ष बंडूकाका जगताप, राहुल गिरमे, गौरी कुंजीर, दत्ता कड, चेतन महाजन, मुरलीधर झुरंगे, राजू बरकडे, गौरव कोलते, शामकांत भिताडे, स्वाती बरकडे आदी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे सरचिटणीस विजय कोलते मनाले की, सासवड ,जेजुरी, फुरसुंगी नगरपालिका तसेच पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि विधानसभा मतदारसंघातील सर्व नगरपालिकांच्या निवडणुका महाविकास आघाडी ताकतीने लढवणार आहे. या बैठकीत तरुणांना वाव देऊन समाजातील पाठिंबा आणि विश्वास मिळवत आघाडीच्या माध्यमातून सर्व निवडणूक लढविण्याचा निर्धार करण्यात आलेला आहे. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप पोमण यांनी स्पष्ट केले की, सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन उमेदवारी ठरवली जाईल आणि एकत्रित ताकतीने निवडणुका लढवल्या जातील, असेही प्रदीप पोमण यांनी स्पष्ट केले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments