पिसे ग्रामपंचायत मध्ये सामान्य नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी गावात आलेल्या कोणत्या सुविधा आहेत यावर सरपंच व ग्रामसेविका यांचा पाच वर्षांमध्ये कुठलाही ताळमेळ सामान्य नागरिकांना मिळत नाही सासवड प्रतिनिधी: आपल्या भागातील समस्या बिकट, प्रश्न संदर्भात उपदेश देण्यापेक्षा नागरिकांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी 15 ऑगस्ट च्या ग्रामसभेत आत्तापर्यंत आपल्या भागातील समस्येची सरपंच ग्रामसेवक व प्रशासनाचा अधिकार यांना जाब विचारला असता, कुठलेही विकास आत्मक काम दिसून येत नाही, 15 ऑगस्टच्या ग्रामसभेमध्ये तुम्ही गावचे विकासाशी संबंधित काही महत्त्वाचे प्रश्न विचारू शकतो, परंतु गावासाठी मंजूर असलेल्या योजनांची माहिती त्यांच्या अंमलबजावणीची स्थिती निधीचा वापर आणि गावातील समस्या व त्यांच्या समाधानासाठी उचललेली पावले, याबद्दल माहिती मिळू शकत आहेत, आपल्या गावाला कोणत्या योजना मंजूर झाल्या आहेत आणि त्या कधीपासून सुरू होणार आहेत, या योजना वर किती निधी मंजूर झाला आहे, आणि तो कसा खर्च केला जाणार आहे, ग्रामपंचायतला विविध योजनांसाठी किती निधी मिळत आहे, हा निधी कोणत्या कामावर खर्च केला जाणारा आहे, निधीचा वापर कसा केला जातो, याचा हिशोब ग्राम सभेत सादर केला जाईल का? गावातील समस्या आणि उपाय गावात कोणत्या समस्या आहेत, ज्यावर तातडीने कार्यवाही करणे आवश्यक आहेत, या समस्या सोडवण्यासाठी ग्रामपंचायत काय उपाययोजना करत आहे, समस्या सोडवण्यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य कसे घेतले जाईल, ग्रामपंचायत सदस्यांचे अधिकार आणि कर्तव्य काय आहेत, ग्रामपंचायत संदेशावर नियंत्रण ठेवण्यासाठी काय व्यवस्था आहे, स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत गावात काय कामे झाली आहेत, गावातील स्वच्छतागृहाची संख्या किती आहेत, आणि त्याची देखभाल कशी केली जाते, गावात कचरा व्यवस्थापनासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत, गावात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कशी आहे, आपल्या भागातील प्रत्येक वार्डात पाण्याची समस्या खरोखरच सुटली आहे का? पाण्याची पातळी वाढवण्यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत, शेतकऱ्यांसाठी सिंचनाची सोय कशी केली आहे, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी काय व्यवस्था आहे, गावात शाळा आणि आरोग्य सुविधांची स्थिती काय आहे, मुलांच्या शिक्षणाच्या चांगल्या संधी कशा उपलब्ध करता येतील, आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, अवैध व्यवसाय संदर्भातही प्रश्न विचारू शकता येतात, आपल्या भागातील अवैध व्यवसाय, दारू, विक्री जुगार मटका, तसेच गावच्या हद्दीतील हॉटेलमध्ये बेकायदेशीर चाललेली दारू विक्री व या व्यवसायामुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी चालली आहेत, या संदर्भात ग्रामपंचायती काय भूमिका घेत आहेत, यासारखे ज्वलंत प्रश्न विचारणे हे सुजाण नागरिकाचे कर्तव्य आहेच, परंतु यावर काही प्रश्न विचारायचे असल्यास, ग्रामसभेचत विचारू शकत आहेत, परंतु तुमच्या गरजेनुसार तुम्ही की विविध विषयावरील गावच्या समस्या संदर्भात प्रश्न विचारू शकता, ग्रामसभा ही एक महत्त्वाची संधी आहे, त्यामुळे या संधीचा पुरेपूर वापर करून घेणे गरजेचे आहे, हे सामान्य नागरिकांचे कर्तव्य आहे, परंतु या मध्ये पिसे येथील सरपंच व ग्रामसेविका यांचा मनमानी कारभार पाच वर्ष चालू आहे, याला ताळेबंद कधी वाचणार, कोणतीही माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पाच वर्षांमध्ये 15 ऑगस्ट 26 जानेवारी यांच्या संदर्भात ग्रामसभा किती झाले आहे,अद्याप पर्यंत ग्रामसेविकेला काही सांगता येत नाही, त्यामुळे हलगर्जीपणा, या निष्क्रियपणामुळे त्या ठिकाणी ग्रामसेविकांनी असला कारभार केला असल्यामुळे, सरपंच व ग्रामसेविका यांचा जाब विचारण्यासाठी सामान्य नागरिकांनी प्रयत्न केला असता, यांना कुठल्याही प्रकारचे उत्तर देता येत नाही. सामाजिक काम केलेले ग्रामपंचायत मधून सरपंच व ग्रामसेविका ही बिल सुद्धा सहा सहा महिने काढत नाहीत मनमानी कारभार ग्रामसेविका व सरपंच यांचा विषय येथील चालू आहे, यावर पुरंदरच्या गटविकास अधिकारी यांनी त्वरित लक्ष घालून यावर कारवाई केली पाहिजे, असे सामान्य नागरिकांचे म्हणणे आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments