Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी सोमवार या दिवशी लोकशाही दिनाचे आयोजन सासवड प्रतिनिधी: सोमवार दि. 18 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता तहसीलदार कार्यालय सासवड येथे लोकशाही दिनाच्या आयोजन केले असल्याची माहिती पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांनी दिली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडील परिपत्रकानुसार महसूल प्रशासन जास्तीत जास्त लोकाभिमुख होण्यासाठी प्रत्येक महिन्याला लोकशाही दिनाचे आयोजन करण्याचे कळवलेले आहे. माननीय जिल्हाधिकारी यांनीही लोकशाही दिन तालुकास्तरावर लोकशाही दिन आयोजन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार पुरंदर तालुक्यामध्ये वेगवेगळ्या स्तरावर प्रत्येक मंडळामध्ये प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही देण्याचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये नागरिकांच्या विविध विभागाच्या अडीअडचणी तक्रारी समस्या जाणून घेणे, त्यांचे तक्रारांची निराकरण करण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकारी यांना दिलेल्या आहेत. सोमवार दि. 18 ऑगस्ट रोजी आयोजित केलेले लोकशाही दिन कार्यक्रम साठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून, सहभाग नोंदवावा असेही आव्हान तहसीलदार पुरंदर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments