पुरंदर तालुक्यामध्ये देशभक्तीचा जल्लोष सांस्कृतिक कार्यक्रम; लयबद्ध संचलन, वीर जवानांना वाहण्यात आली श्रद्धांजली सासवड प्रतिनिधी: 'भारत माता की जय' आणि 'जय जवान जय किसान' वंदे मातरम च्या घोषणांनी पुरंदर तालुका हा अक्षरशा देशभक्तीच्या वातावरणात दुमदुमून गेला होता, गावोगावी विद्यार्थ्यांनी काढलेल्या प्रभात फेऱ्या, स्वच्छता व एकटीचा संदेश देणारे उपक्रम तालबद्ध कवायती, सांस्कृतिक कार्यक्रम, बँड पथकाचे संचालन, वीर जवानांच्या पालकांचा सन्मान आणि शहीद जवानांना अर्पण केली श्रद्धांजली, यामुळे तालुक्यामध्ये स्वातंत्र्य दिन हा सोहळ्याला एक प्रकारचे चांगलीच ऊर्जा निर्माण झाल्याचे स्वरूप दिसत होते. सासवड तहसील कार्यालयात प्रांताधिकारी वर्षा लांडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी तहसीलदार विक्रम राजपूत, गट विकास अधिकारी प्रणोती श्रीश्रीमाळ, पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, शेतकरी नेते दिलीप गिरमे, सामाजिक कार्यकर्ता सुनीता कोलते, माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. पुरंदर हायस्कूल, वाघीरे हायस्कूल, कन्या प्रशाला, शिवाजी इंग्लिश मीडियम वाघीरे कॉलेज आणि नगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेले संचालन, विशेष प्रकारचे आकर्षण ठरले. प्रामुख्याने नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये 79 व्या झेंडावंदन प्रांत अधिकारी वर्षा लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले, तसेच सासवड नगरपालिकेचे सुद्धा झेंडावंदन वर्षा लांडगे यांच्या हस्ते झाले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments