Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील भुलेश्वर येथे कावड व पालखी मिरवणूक; तर शिवलिंगाच्या दर्शनासाठी हजोराच्या संख्येने जनसमुदाय सासवड प्रतिनिधी: पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील देवस्थान श्री क्षेत्र भुलेश्वर येथे श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी दि. 18 भक्तिमय वातावरणामध्ये दिवसभरामध्ये हजारो भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले, यावेळी शिवलिंगाची अर्ध नारी नटेश्वर पूजा साकारण्यात आली. पहाटे शिवलिंगास दही, दूध व पंचामृत आणि अभिषेक घालण्यात आला.सकाळी पहाटे पाच वाजता महाअर्थीने विधीची सुरुवात झाली. माळशिरस ग्रामस्थांच्या वतीने दक्षिण मध्य मुंबईचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी महापूजा केली. तसेच आमदार विजय शिवतारे, गट विकास अधिकारी प्रणोती श्री श्रीमाळ, अक्षरसृष्ठी संस्थेचे सिद्धनाथ पवार, पंचायत विस्तार अधिकारी संतोष नेवसे, ग्रामपंचायत अधिकारी विलास बडदे, निरा बाजार समितीच्या संचालिका शहाजान शेख यांनी यावेळी दर्शन घेतले. रविवारी दि. 17 सासवड येथील मानाच्या कावडीचे प्रस्थान होऊन, सोमवारी सकाळी ढोल ताशाच्या गजरात कावड भुलेश्वर मंदिरावर आणण्यात आली,तसेच प्रथम मानाच्या कावडी राजुरी व पिसे येथील सुद्धा मानाच्या कावडीचे प्रस्थान होऊन, ढोल ताशाच्या गजरामध्ये कावड भुलेश्वर मंदिरापर्यंत आणण्यात आली. दुपारी मंदिर पायथ्याशी असलेल्या कुंडामध्ये भुलेश्वर स्नान घालण्यात आले. त्यानंतर कावड मिरवणूक व पालखी सोहळा उत्साहात पार पडला." हर हर महादेव" च्या घोषणांनी संपूर्ण डोंगर दणाणून गेला, दुपारी चार वाजता मंदिर प्रवेशद्वाराजवळ महानाच्या कावडींची धार घालून, पालखीची महाआरती करण्यात आली.पिसे येथील संतोष मुळीक उद्योगपती, प्रकाश मुळीक, संतोष राजाराम मुळीक, रमाकांत सोनबा मुळीक, अक्षय प्रकाश मुळीक, रविद्र अशोक मुळीक, आदेश भानुदास मुळीक, संजय बाबुराव मुळीक, अशय प्रकाश मुळीक, सोनू शिदकर, गावातील तरुण वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते. तर राजुरी येथील कावडीचे मनोहर भगत, बाळासो कोलते, संभाजी चव्हाण, महेश हरिभाऊ भगत, दादा भगत, तुकाराम भगत, सत्यवान चव्हाण, कैलास सयाजी भगत, विपुल भगत, दादा शेडगे, सुधाकर भगत, नाथा भालेराव ,सचिन भगत ,विठ्ठल भगत, संतोष गाडेकर, तरुण मंडळ राजुरी, तात्या गायकवाड, राजुरी ग्रामस्थ , संपत चोरघडे आदी कावडीसाठी उपस्थित होते. सायंकाळी पालखी वाजत गाजत राजुरी व पिसे येथे आणण्यात आली व रात्री गावातील मिरवणुकीने यथाविती सांगता करण्यात आली. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी यावेळी उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. वाहनांना वन विभागाच्या कमानी बाहेर अडवण्यात आल्याने, वाहतूक कोंडी झाली नाही, जेजुरी पोलीस ठाण्याच्या वतीने बंदोबस्त, प्राथमिक आरोग्य केंद्राकडून आरोग्य सेवा, तर ग्रामपंचायतीकडून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. दिवसभरामध्ये अनेकांनी अन्नदान केले, शिवलिंग व मंदिर परिसर फुलांनी सजवण्यात आला होता.

Post a Comment

0 Comments