Hot Posts

6/recent/ticker-posts

सासवड येथील पालखी तळावर आनंद (भैय्या) जगताप यांच्या गोकुळ दहीहंडी फोडताना रुद्र प्रताप संघाने पटका वले बक्षीस सासवड प्रतिनिधी: सासवड ता. पुरंदर या ठिकाणी आकर्षक अशी विद्युत रोषणाई, डीजे दणदणात थरकाईवर तरुणांची चौकाचौकातून फ्लेक्स बाजी, दाटी स्पीकरवर गोविंदाचा ताल धरायला लावणारी अशी गाणी, हंडी फोडणाऱ्या गोविंदांच्या या सर्व झुंडी वर डोळ्यात साठवण्यासारखे हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरलेली असे तरुण वर्ग, अशा स्वरूपामध्ये सासवड शहरातील दहीहंडी उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा झाला. सुमारे नऊ वर्ष हा उत्सव साजरा करीत असताना, सोपानगर येथील आनंद (भैय्या) जगताप यांच्या पालखीतळावरच्या गोकुळ दहीहंडीला सिने अभिनेत्री विदुला चौगुले आणि सुप्रसिद्ध निवेदिका प्रतिभा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.1 लाख 11 हजार एकशे अकरा रुपये बक्षीस असलेली दहीहंडी पुरंदर तालुक्यातील रुद्र प्रताप संघाने चित्त थरारक पद्धत तिने कामगिरी करत फोडली. गोकुळ दहीहंडी उत्सव समिती, सासवड यांच्या वतीने आयोजित दहीहंडी पूजनाचा कार्यक्रम निरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नंदूकाका जगताप, पुरंदर पंचायत समितीचे माजी उपसभापती निलेश भाऊ जगताप, सासवड नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष यशवंत जगताप, भैरवनाथ चैत्र उत्सवचे माजी अध्यक्ष संजय दत्तात्रय जगताप आणि दहीहंडी उत्सव समितीच्या सदस्यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजय चंदूकाका जगताप, पुणे जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष गंगारामदादा जगदाळे, पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य गिरीश जगताप, ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी जगताप, सुनिताकाकी कोलते, माजी उपनगराध्यक्ष मनुतात्या जगताप, माजी उपनगराध्यक्ष सुहास लांडगे, माजी उपनगराध्यक्ष विजय वढणे, माजी नगरसेवक संदीप राऊत यांच्यासह बहुसंख्येने नागरीक उपस्थित होते.सासवड पोलीस स्टेशनच्या वतीने या उत्सवादरम्यान नशा मुक्तीबाबत जनजागृती करण्यात आली. विशेष म्हणजे, या दहीहंडी उत्सवात पारंपरिक वाद्य (हलगी) यांचा समावेश होता, ज्यामुळे कार्यक्रमाला सांस्कृतिक रंगत प्राप्त झाली.शेवटी, भारतीय जनता पार्टी सासवड शहराचे अध्यक्ष व गोकुळ दहीहंडी उत्सव समितीचे संस्थापक यांनी सर्वांचे आभार मानले आणि पुढील वर्षी दशक महोत्सवी वर्ष अजून दिमाखात साजरे करण्याचा संकल्प व्यक्त केला. हा उत्सव सासवड शहरातील सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेचे प्रतीक ठरला.यासाठीच उपविभागीय अधिकारी राजेंद्रसिंह गौर याच्या मार्गदर्शनाखाली सासवड पोलीस स्टेशनचे निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी सासवड शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Post a Comment

0 Comments