पुरंदर तालुक्यातील गुरोळी या ठिकाणी एक युवकाला कोयत्याने मारहाण; तर नग्न करून जीवे मारण्याची धमकी चार जणावर सासवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल सासवड प्रतिनिधी: मारहाण का करत आहात जाब विचारला असता, त्या कारणावरून एकाला नग्न करून, त्याचा व्हिडिओ काढून, लाकडी दांडक्याने, कोयत्याने डोक्यात मारहाण केली असल्याची घटना रविवारी दि. 17 रोजी घडली. या प्रकरणी सुनिल रामचंद्र खेडेकर, रामचंद्र यशवंत खेडेकर, आनंद रामचंद्र खेडेकर आणि गौरव भाऊसो खेडेकर सर्वजण (राहणार गुरोळी ता. पुरंदर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत दिपक रामचंद्र खेडेकर (रा. गुरोली ता. पुरंदर) यांनी सासवड पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. फिर्यादी दिपक खेडेकर हे रविवारी सायंकाळी साडेपाच च्या सुमारास मंगेश रमेश खेडेकर यांच्या गोटयावर गुराना चारा टाकण्यासाठी गेले होते, त्यावेळी सुनिल खेडेकर यांनी फोन करून विराज कोलते यास घेण्यासाठी पाठवल्याने दिपक हे सुनील यांच्या पोल्ट्रीवर गेले त्या ठिकाणी सुनिल खेडेकर, रामचंद्र खेडेकर व आनंद खेडेकर हे विराज कोलते व मयंक कोलते यांना मारहाण करीत होते, त्यांनी का मारता अशी विचारणा केली असता, याचे शूटिंग करण्यासाठी दिपक यांनी मोबाईल काढला त्यावेळी गौरव खेडेकर यांनी तो मोबाईल हिसकावून खाली फेकून दिला व शिवीगाळ करीत, सुनील खेडेकर, रामचंद्र खेडेकर, आनंद खेडेकर व गौरव खेडेकर यांनी व्हिडिओ काढतो का? असे म्हणून मारण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोल्ट्रीमध्ये नेत आनंद खेडेकर यांनी तेथे पडलेले कॅरेट डोक्यात मारले आणि रामचंद्र खेडेकर यांना डोक्यात हातावर व मांडीवर काठीने मारहाण केली. यावेळी सुनिल खेडेकर यांनी तेथील कोयता डोक्यात मारला, याचवेळी कपडे काढीत त्याचा व्हिडिओ काढला व तू कोणास सांगितल्यास हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे दिपक याच्या तक्रारीत नमूद केले आहे. सदरील गुरोली येथील घडलेला गुन्हा सासवड पोलीस स्टेशन येथील पोलीस हवालदार शेगर यांनी दाखल करून घेतला, तर पोलीस निरीक्षक सासवडचे ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ओमासे हे पुढील तपास करीत आहेत.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments