Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील गुळूंचे या ठिकाणी बालविवाह रोखण्यात जेजुरी पोलीसाना यश आले सासवड प्रतिनिधी: पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील माळवस्ती भागात सुरू असलेला बालविवाह जेजुरी पोलिसांच्या सतकॅते मुळे रोखण्यात आला. पोलीस पाटील दिपक जाधव यांनी याबाबत जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली होती. गुळूंचे येथील माळवस्ती भागात चोरी छुपे अल्पवयीन मुलीचा विवाह होत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी यांना समजली असता, लागलीच त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे यांना कल्पना दिली, आदेश मिळता स्थानिक पोलिसांनी सिव्हिल ड्रेस मध्ये घटनास्थळी हजेरी लावली. त्यावेळी विवाहाची शेवटची मंगलाष्टका सुरू असल्याचे उपस्थितांनी सांगितले. पोलिसांनी कागदपत्राचे खातर जमा केल्यावर त्यांना वधूचे वय 18 वर्षापेक्षा कमी आढळले, त्यानंतर चौकशीसाठी नवरा मुलगा, मुलगी, आजी, आई मुलीच्या पालकांना जेजुरी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. चौकशी पूर्ण होत आज रविवारी दि. 17 रोजी बालविवाह प्रतिबंध अधिनियमाच्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. घटनेचा पुढील तपास हरिश्चंद्र करे करीत आहेत. शासनाच्या आदेशांना आता हरताळच बसत आहे ,बालविवाह रोखण्यासाठी गाव स्तरावर बाल संरक्षण समितीची स्थापना करणे, 10 जून 2014 रोजीच्या धोरणाप्रमाणे बंधनकारक आहे, शाळा स्तरावर देखील बाल संरक्षण समिती यांची स्थापना करण्याची शासनाचे आदेश आहेत, ग्रामीण भागात या आदेशांना नेहमी दुर्लक्षित केले जात आहे,, बालविवाह रोखण्याची जबाबदारी दूरच परंतु ,अशा गुन्ह्यातील आरोपीवरील दाखल गुन्हे मागे घेण्याबाबत प्रयत्न करताना स्थानिक गाव पुढारी दिसत आहेत, त्यामुळे बालविवाहाचे प्रमाण कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. ही खेदजनक पुरंदर तालुक्यात घटना घडली आहे यावर पुरंदर तालुका विदयमान आमदार अधिवेशनात यावर आपले मत व्यक्त करणार का? हा तर सवॅ सामान्य नागरीकात बातचीत पारावर बसून गप्पा गोष्टी चालू आहेत.

Post a Comment

0 Comments