Hot Posts

6/recent/ticker-posts

सामाजिक बांधिलकी जपत दिव्यांगांना किराणा किटचे वाटप सासवड प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकी जपत स्वर्गीय एकनाथकाका जगताप प्रतिष्ठानच्या वतीने रॉबिन हूड आर्मी पुणे यांच्या सहकार्याने पुरंदर तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी मोफत किराणा किट वाटप करण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत सुमारे दीडशेहून अधिक दिव्यांग बांधवांना जीवनावश्यक वस्तूंची किट देण्यात आली.सुपेखुर्द, नारायणपूर, भिवडी, पिंपळे, खळद, पारगाव, एखतपूर, मुंजवडी, सोनोरी आणि सासवड या गावांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. विविध गावांमध्ये स्थानिक कार्यकर्त्यांनी वाटपाचे आयोजन केले. त्यात सुपेखुर्द येथे महेश राऊत,भिवडी येथे बाबू न्हालवे, पिंपळे येथे अमित पोमण, नारायणपूर येथे रामभाऊ बोरकर व संदीप पोमण, खळद येथे युवराज कामठे, एखतपूर येथे तुषार झुरंगे, पारगाव येथे बापू मेमाणे, सोनोरी येथे संतोष काळे तर सासवड येथे काशिनाथ जगताप व दत्ता दगडे यांनी पुढाकार घेतला.स्व. एकनाथकाका जगताप प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप यांनी सांगितले की, “दिव्यांग बांधव हे समाजाचा अविभाज्य घटक असून त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रतिष्ठान कटिबद्ध आहे. भविष्यातही दिव्यांग बांधवांना आवश्यक अस णारे साहित्य उपलब्ध करून देण्याचे काम प्रतिष्ठानतर्फे करण्यात येईल.”स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत करत प्रतिष्ठानचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments