Hot Posts

6/recent/ticker-posts

"पुरंदर मध्ये भाजपचे कार्य अतिशय दमदारपणे चालू आहे."___ धीरज घाटे शहराध्यक्ष पुणे शहर भाजपा सासवड प्रतिनिधी: भिवरी रविवार दि. 17 ऑगस्ट 2025 रोजी पुणे शहर भाजपा अध्यक्ष धीरज घाटे यांनी भिवरी येथे भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळेस पुरंदर तालुका भाजपा पश्चिम मंडल चे अध्यक्ष संदीप बबनराव कटके पाटील उपस्थित होते. पुरंदर भाजप युवा मोर्चाचे मा अध्यक्ष दिलीप पाटील यांच्या शुभहस्ते पुणे भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे यांचा सन्मान करण्यात आला. "केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यात पुरंदर भाजपाचे कार्यकर्ते यशस्वी झाले आहेत." असे गौरवोद्गार धीरज घाटे यांनी काढले. याप्रसंगी सोसायटीचे संचालक किरण शेठ कटके पाटील , कारखानदार अशोकराव कटके पाटील , अध्यक्ष शेखर रामदास कटके पाटील , व्हाईस चेअरमन सुनील रामदास गोफने , तंटामुक्ती मा अध्यक्ष हनुमंत आण्णा कामठे मा उपसरपंच तुकाराम एकनाथ कटके पाटील , घिसरेवाडी शाखाध्यक्ष मनोहर बापू घिसरे , उपसरपंच मारुती भैरू कटके पाटील भिवरी ग्रामस्थ उपस्थित होते. सदिच्छा भेटीनंतर ते हॉटेल लोणकरवाडा येथे चहापानासाठी थांबले. ग्रामस्थांशी चर्चा करून नंतर ते पुण्याच्या दिशेने रवाना झाले.

Post a Comment

0 Comments