Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील राऊतवाडी येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याचे उपोषण स्थगित सासवड प्रतिनिधी: परिचे( ता. पुरंदर) नजदिक राऊतवाडी येथील लघुपाटबंधारे तलाव, वीर नाला प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची नावे मागील 30 वर्षापासून, सात बाऱ्यावर नोंदवण्यात आलेली नाही, या अन्याय विरोधात प्रकल्पग्रस्तांनी शुक्रवारपासून( दि. 15) तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते, मात्र तहसीलदार विक्रम राजपूत यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण ते स्थगित करण्यात आले, शासनाने 1996 मध्ये जिल्हाधिकारी आणि पुनर्वसन अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वीर येथे प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन करून शेतीची जमीन ताब्यात दिली. फेरफार क्रमांक 1291 व 2293 तयार असून, इतर प्रकल्पग्रस्तांची नावे सातबारावर झाली, असताना परिंचे राऊतवाडी येथील शेतकऱ्यांची नावे अद्याप दाखल झालेली नाहीत, यामुळे शेतकऱ्यांना पाणी योजना, बँकेचे कर्ज, शासकीय योजना याचा लाभ मिळत नाही, तसेच मूळ मालकाकडून दादागिरी व त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. यावेळी उपोषणाला प्रकल्पग्रस्त शेतकरी महेश रामचंद्र राऊत, गणेश दशरथ राऊत, महेश गणपत राऊत, सुजित रामदास राऊत, प्रमोद केशव नवले, प्रवीण मल्हारी नवले, अमोल लक्ष्मण राऊत, रितेश रमेश राऊत हे बसले होते.

Post a Comment

0 Comments