पुरंदर तालुक्यातील यादव वाडी येथे शेतातील काम उरकून घरी जाताना चार चाकी च्या धडकेमध्ये दोन शेतकरी जागीच मृत्यूमुखी सासवड प्रतिनिधी: पुरंदर तालुक्यातील परिंचे नजीदिक( यादव वाडी ता. पुरंदर )येथील वृद्ध दामत्य शेतातून घरी जात असताना सासवड परिंचे रस्त्यावर पाठीमागून येणाऱ्या भरदाव इको गाडीने धडक दिल्याने, त्यांचा मृत्यू झाला. याबाबत सासवड पोलिसात गाडी चालक बापूराव जगताप यांच्या विरोधात आनंदराव यादव यांचे पुतणे अमित यादव यांनी गुन्हा दाखल केला आहे. आनंदराव रामचंद्र यादव (वय 77) व पत्नी सिंधूमती आनंदराव यादव (वय 65 )असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. आनंदराव यादव व सिंधुमती यादव हे नेहमीप्रमाणे सासवड रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात गेले होते, शेतात त्यांचा मुलगा निलेश यादव याचे फार्म हाऊस नावाचे हॉटेल आहे. शेतातील कामे आटोपून हे शेतकरी संध्याकाळी सहा वाजता घरी जात असताना, सासवडकडून परिंचे गावच्या दिशेने जाणाऱ्या बापूराव जगताप चालवत असलेल्या इको गाडीने पाठीमागून जोरात येऊन धडक दिली, हॉटेलमध्ये असलेला त्यांचा मुलगा व नातेवाईक तातडीने घटनास्थळी पोचून, स्वतःच्या गाडीतून जखमी दांपत्याला सासवड येथे धन्वंतरी रुग्णालय येथे दाखल केले असता, उपचारा पूर्वीच आनंदानेस्वागत यादव यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर पत्नी सिंधूमती यादव यांना पुढील उपचारासाठी पुणे येथील नोबेल हॉस्पिटलमध्ये सिंधूमती यादव यांना दाखल केले असता, त्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्या असल्याची डॉक्टरांनी माहिती दिली. यादव वाडी, हरगुडे, सटलवाडी परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे. पहाटे अडीच वाजता यादव वाडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अत्यसंस्कार केले. पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पालवे पुढील तपास करीत आहेत. या दरम्यान, यादव कुटुंबावर काळाने घाला घातल्याने, ऐन सणासुदीच्या तोंडावर कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे यादव वाडी परिसरावर शोक कला पसरली असून, हळहळ व्यक्त होत आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments