पुरंदर तालुक्यातील कानिफनाथ गडावर दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात सासवड प्रतिनिधी: पुरंदर तालुक्यातील बोपगाव येथील श्री कानिफनाथ गडावर श्रावण कृष्ण अष्टमी 16 ऑगस्ट रोजी गोकुळ अष्टमी निमित्ताने हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम उत्साहामध्ये संपन्न झाला. यावेळी कानिफनाथ भक्तांनी "गोविंदा आला रे गोविंदा आला चा घोष" जयघोशाचा करण्यात आला. कानिफनाथ गडावर पहाटे पाच ते सात देवांना अभिषेक घालण्यात येऊन, महापूजा आरती झाली. त्यानंतर बोपगाव येथून निघालेल्या दिंडीचे कानिफनाथ गडावर स्वागत करण्यात आले. दुपारी बारा वाजता नाथाची आरती झाल्यानंतर, कानिफनाथ भक्त सर्जेराव नाना जगदाळे यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम कानिफनाथ भाविक भक्तांच्या साक्षीने संपन्न झाला. कानिफनाथ मित्र मंडळ यांच्या उपस्थितीने महाप्रसाद भाविक भक्तांना देण्यात आला. बोपगाव येथील भजनी मंडळाच्या वतीने, भजनाची सुरेल मैफिल संपन्न झाली. दहीहंडी उत्सवाचे आयोजन श्री नवनाथ देवस्थान पंचायत कमिटी ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानोबा फडतरे, उपाध्यक्ष दिपक फडतरे, सचिव जयवंत फडतरे, खजिनदार नागेश फडतरे, संचालक शिवाजी जगदाळे, प्रकाश नाना फडतरे, प्रकाश आप्पा फडतरे, सुरेश फडतरे, महादेव फडतरे, नितीन फडतरे, रमेश फडतरे, मंगेश फडतरे, सोनबा फडतरे, व्यवस्थापक संतोष गोफणे, पांडुरंग बाठेे व बोपगावकर ग्रामस्थ यांनी केले. दुपारी दीड वाजता छबिना निघाला, ढोल लेझीमच्या तालावर उपस्थित भाविक भक्तांनी जोरदार पद्धतीने ठेका धरला. सायंकाळी बोपगाव येथून निघालेली दिंडी कानिफनाथ गडावरच्या दहीहंडी कार्यक्रमानंतर, पुन्हा बोपगावला परतली. गावात आल्यानंतर येथे गावचा दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम झाल्याची माहिती उपाध्यक्ष दिपक फडतरे यांनी प्रतिनिधीला दिली.अं
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments