Hot Posts

6/recent/ticker-posts

हिवरे गावच्या सरपंचपदी शोभा दळवी बिनविरोध सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर तालुक्यातील हिवरे गावच्या सरपंच पूनम कामठे यांचा कार्यकाल पूर्ण झाल्यामुळे, त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या रिक्त जागी निवडणूक होऊन शोभा शांताराम दळवी यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली असल्याचे, मंडल धिकारी सुहास कांबळे यांनी जाहीर केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य मनोज कुटे, राजेंद्र जाधव, पुनम कामठे उपस्थित होते. सचिन लिंभोरे, नंदकुमार गायकवाड व पूनम कुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड संपन्न झाली. यावेळी सचिन लिंभोरे, निलेश गायकवाड, अरुण कुदळे, महेश गायकवाड, सुदर्शन कुदळे, अजित लिंभोरे, भरत कुदळे, संदीप दळवी, विनायक लिंभोरे, सोपान कामठे, चंद्रकांत गायकवाड, सतीश कुटे, शांताराम दळवी, ग्रामसेविका माधवी हरपळे, मच्छिंद्र दळवी, पांडुरंग दळवी, लक्ष्मण दळवी, एकनाथ दळवी, हिरामण दळवी, संदीप दळवी, दादा लिंभोरे, विक्रम बिरामणने आदी उपस्थित होते. मला मिळालेल्या संधीचं सोनं करून येणाऱ्या काळामध्ये गावच्या विकासासाठी अधिकाधिक निधी आणून, गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार. असे सत्काराला उत्तर देताना शोभा दळवी यांनी सांगितले.बालमित्र वर्गमित्र शांताराम दळवी यांच्या शोभाताई शांताराम दळवी यांची हिवरे ग्रामपंचायत सरपंचपदी निवड झाल्याबद्दल सन 1986, बॅच चे वर्गमित्र यांनी शांताराम दळवी यांच्या निवासस्थानी जाऊन सरपंच शोभाताई शांताराम दळवी अभिनंदन केले. यावेळी संजय कटके मा. सरपंच भिवरी,सखाराम नाना कटके मा. सरपंच भिवरी,सोपान भिसे मा. सरपंच भिवरी, पोपट दादा कटके प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक भिवरी, परशुराम कटके हॉटेल व्यावसायिक भिवरी, उत्तम गायकवाड प्रसिध्द व्यावसायिक,जगन्नाथ गायकवाड हिवरे व बाबुराव गायकवाड आदर्श शिक्षक आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments