Hot Posts

6/recent/ticker-posts

शिक्षणाची वाट बिकट व धोकादायक बहिरवाडी शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या बहिरवाडी येथे मुसळधार व संततधार पावसाने ओढ्या, नाल्यांना पूर आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाळ्यात नेहमीच चार महिने विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून, ओढा ओलांडावा लागतो. जवळपास तीन ओढ्याचे पाणी ओलांडून मुलांना शाळेत यावे लागते. किल्ल्याच्या परिसरात असलेल्या वस्त्यांवरून हि मुले शाळेत येतात याठिकाणी कोणी आजारी असेल तर झोळी करून या ओढ्यातून जावे लागते.बहिरवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत मखालमाची परिसरातून ९, बापदेव माची परिसरातून ८ ,उंबरदरा (वज्रगड परिसर)२, कोकरेवस्ती ७ मुलांना शाळेत येताना कसरत करावी लागते. डोंगर दरी परिसर, भयानक वारा, सततच्या कोसळधारा, निसरड्या वाटा , पूरस्थितीमुळे सदर ठिकाणी तीन सांकव पुलाची मागणी होत असून, माध्यमिक शाळेतील मुलांना जाण्यासाठी एस.टी नव्याने ,नवीन वेळेत पानवडी मार्गे करण्यासाठी मागणी होत आहे. पावसाळ्यात चार महिने ढगफुटी सदृश परिस्थिती व काळोखाची परिस्थिती असते. सोनबा कोकरे ,धनगर (पुरंदर किल्ला परिसरात वनौषधी देणारे )यांच्या वाड्यातून २ चिमुकले डोंगर दरीतून , पायी पावणेदोन तास चालत , निसरड्या वाटेने,आजीसोबत शाळा गाठतात.पावसाळी परिस्थिती पाहून, गावातील तरुण अमोल भगत ,अमोल कोकरे ,ओमकार पांगसे ,आप्पासो कोकरे, मयूर ढगारे यांनी मुलांना ओढ्यातून मानवी साखळीच्या मदतीने बाहेर काढले. वेळेवर एस.टी बस नसल्याने, माध्यमिक शाळेतील ६२ मुले व उच्च माध्यमिक शिक्षण घेणारी १५ मुले रोज पायपीट करावी लागत असून , मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. वंचित कोळी महादेव, डोंगरी धनगर समाजाचे नुकसान टाळण्यासाठी ,तसेच नैसर्गिक परिस्थितीत विद्यार्थी हित व सुरक्षितता लक्षात घेता, तीन ठिकाणी सांकव पूल व सकाळी संध्याकाळी पानवडी मार्गे बहिरवाडी एस.टी सुरू करण्याची मागणी होत असल्याचे, मुख्याध्यापक अनिल गळंगे यांनी सांगितले असून ,यावेळी उपशिक्षिका रूपाली गळंगे , स्वाती वाघमारे, पार्वती भगत , विभा कोकरे,रंजना कोकरे ,सुनीता कोकरे ,शोभा ढगारे,संगीता भगत , मंगल जानकर, बाळासो वांभिरे आदी पालक व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते....फोटो ओळ -: बहिरवाडी (ता.पुरंदर) मुलांना ओढ्यातून मानवी साखळीच्या मदतीने शाळेत सोडावे लागत आहे.

Post a Comment

0 Comments