Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणचा रस्ता भूसंपादना अभावी तेरा वर्षापासून रखडलेला आहे; त्यासाठी बाधित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी सासवड प्रतिनिधी: पुणे सासवड पंढरपूर महामार्गावरील वीर ते बोरावके मळ्यापर्यंत माऊली विसाव्यापर्यंत भूसंपादन रखडलेले आहे, वीर फाटा ते बोरावके मळा कॉर्नर हा दीड किलोमीटर लांबीचा रस्ता सन 2013 पासून रखडला आहे, त्याला प्रशासनाची उदासीनता कारणीभूत असल्याचा आरोप करीत बाधित शेतकऱ्यांनी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना सोमवारी दि. 11 रोजी निवेदन दिले आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालय डुडी यांना बाधित शेतकऱ्यांसोबत प्रत्यक्ष बैठक घेतली होती, दोन महिन्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिले होते की, या भूसंपादनासाठी 30 कोटी रुपयांचा निधी शासन दरबारी पाठपुरावा करून, प्राप्त करून दिला जाईल, यावर तात्काळ कार्यवाही होईल, परंतु दीड ते दोन महिने झाले उलटूनही, त्या ठिकाणी कोणताही मोबदला आम्हाला मिळालेला नाही, यामुळे बैठकीत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यावर बाधित शेतकऱ्यांच्या मागण्या अडीअडचणी समजून घेऊन, त्या सरकार दरबारी मांडणार आहे. असे आश्वासन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना शेतकरी जमीन मालकांच्या शिष्ट मंडळाने दिले आहे. आळंदी ते पंढरपूर 965 क्रमांकाच्या पालखी महामार्गाचे काम पूर्णत्वास जात आहे, दुसरीकडे मात्र सासवड हद्दीतील दीड किलोमीटरचा रस्ता शासनाच्या उदासीनतेमुळे रखडलेला आहे, या मार्गाने संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा जातो, सन 2013 मध्ये खाजगीकरणाअंतर्गत रस्त्यावर चौपदरी रस्ता बांधकामाचे काम मंजूर होते, रस्त्याचे भूसंपादन झाले, परंतु लागणारा निधी उपलब्ध झाला नाही, त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध वाढला परिणामी काम पूर्ण झाले नाही, असेही सांगण्यात आले आहे. पुणे पंढरपूर महामार्गावरील वीर फाटा ते बोरावके मळा माऊली विसाव्यापर्यंत भूसंपादन रखडले आहे, 2013 पासून रखडलेला भूसंपादन प्रश्न मार्गी लावून 150 बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. सचिन राऊत, बाधित शेतकरी सासवड.

Post a Comment

0 Comments