पुरंदर तहसिलदार व मंडल अधिकाऱ्यावर गंभीर असे आरोप; तर 19 जानेवारीपासून नवीन प्रशासकीय इमारती या ठिकाणी उपोषण आर्थिक तळजोडीचा आरोप सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील मोजे आंबोडी येथील अनुसूचित जाती प वर्गातील महार वतन शेतकऱ्यांवर अन्याय करत आर्थिक तडजोडीतून रस्ता मंजूर केल्याचा गंभीर आरोप, पुरंदरचे तहसिलदार विक्रम राजपूत व सासवडचे मंडल अधिकारी सुहास कांबळे यांच्यावर करण्यात आला आहे, या प्रकरणाची खाती न्याय चौकशी करून, दोषीवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच अन्यायकारक आदेश तात्काळ रद्द करावेत, या मागणीसाठी सोमवारी दि. 19 जानेवारी 2026 पासून, उपविभागीय अधिकारी तथा प्रांत अधिकारी यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आंदोलन सुरू करण्यात येणार आहे, मोजे आंबोडी तालुका पुरंदर येथील गट क्रमांक 136, 132, 138, 149, 140, 141, 142, 143, 144, 145 व 146 या महार वतन इनाम वर्ग सहा, वर्ग दोन, जमिनीमधून जबरदस्तीने रस्ता काढण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप बाधित शेतकऱ्यांनी केला आहे, जमीन क्रमांक 261 / 2024 अंतर्गत महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 च्या कलम 143 अन्वये रस्ता मागणीचा अर्ज दाखल करण्यात आला होता, शेतकऱ्यांचा आरोप आहे की, सदर अर्जातील काही मूळ अर्जदारांनी प्रत्यक्ष अर्जावर स्वाक्षरी केलेली नाही, तसेच न्यायालयीन कामकाजात हजर राहिल्याचेही कोणतीही पुरावे सादर झालेली नाहीत, काही अर्जदारांचे परस्पर नाते स्पष्ट नसतानाही, मंडल अधिकाऱ्यांनी त्यांचे जबाब नोंदवलेले नाहीत, मूळ अर्जदार नसतानाही ,अन्वर बाबुलाल शेख यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी अजॅचा गैरवापर करून न्यायालयाची दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे, याशिवाय संबंधित ठिकाणी आधीपासूनच सार्वजनिक वही वाटीचा रस्ता, अस्तित्वात असताना, केवळ गरीब, अनुसूचित जातीतील शेतकऱ्यांना त्रास देण्याच्या हेतूने व महार वतन जमिनी बळकावण्याच्या साठी हा प्रकार केल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे, उच्चदाब विद्युत वाहिनी खाली बेकायदेशीर बांधकाम, तसेच महार वतन जमिनीवर अतिक्रमण झाल्याचे, आरोपही यावेळी करण्यात आले, तहसीलदार व मंडळ अधिकाऱ्यांनी बाधित शेतकऱ्यांना कोणतीही नोटीस न देता, त्यांचे जबाब नोंदवलेले नाहीत, वकीलपत्र सादर करण्याची संधी दिलेली नाही ,तसेच केवळ मंडल अधिकाऱ्याच्या अहवालावर अवलंबून राहून, निर्णय दिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे, हा निर्णय अन्यायकारक असून, आम्हाला मान्य नसल्याचे ,आंदोलकांनी स्पष्ट केले आहे, हे आंदोलक म्हणजे एक) प्रकाश रामचंद्र रणपिसे. दोन) चंद्रकांत जनार्दन रणपिसे. तीन) अशोक धाकूजी रणपिसे यांचे म्हणणे असे आहे की, अन्वर बाबुलाल शेख यांनी बबन शंकर रणपिसे, सुवर्णा राजाभाऊ गायकवाड यांच्याकडून त्यांची शेतजमीन ही विकत घेतलेली आहे, आणि आम्हा सामान्य शेतकऱ्यांना शेजारील शेतकऱ्यांना त्रास देण्यासाठी पाणंद रस्त्याची मागणी करून, रस्त्यासाठी त्यांनीत्या ठिकाणी मंडल अधिकारी यांनी आर्थिक तडजोडीतून हा निकाल एकतर्फी देऊन, या ठिकाणी या शेतकऱ्यावरती अन्याय केलेला आहे, या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष: चौकशी करून, दोषीवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा आंदोलन शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिलेला आहे.अशी माहिती शेतकरी प्रकाश रणपिसे,चंद्रकात रणपिसे,अशोक रणपिसेयांनी ही माहिती प्रतिनिधीला दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments