Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील सासवड मध्ये सासवड नगरपरिषदेची सव्वादोन कोटीची थकबाकी सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड नगरपरिषद प्रशासनाने 2025- 26 या आर्थिक वर्षासाठी कर वसुलीची मोहीम अधिक तीव्र केली आहे, ज्या मिळकत धारकाकडे मालमत्ता कर थकीत आहेत, त्यांनी 30 जानेवारी 2026 पर्यंत कराचा भरणा न केल्यास, जप्ती नळ जोड तोडणे, आधीसारखी कठोर कारवाई करण्यात येणार आहे ,नगरपरिषदेइकडे सुमारे दोन कोटी, 15 लाख रुपये शासकीय दंड स्वरूपात थकीत आहेत, थकीत मिळकत धारकासाठी शासनाने अभय योजना सुरू केली असून, या अंतर्गत मूळ कराचा पूर्ण भरणा करणाऱ्या नागरिकांना शास्तीमध्ये अंशत किंवा पूर्ण सवलत मिळणार आहे, ही संधी गमावू नये, असे आवाहन मुख्याधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण यांनी दिली आहे, मुदतीत कर न भरल्यास नगरपरिषद अधिनियम 1965 नुसार मालमत्ता सील करणे, किंवा जप्त करणे, नळ जोड खंडित करणे, जमीन महसूल सहितेनुसार इतर मिळकतीवर बोजा चढवणे ,महत्त्वाच्या चौकामध्ये फ्लेक्स लावून, थकबाकीदारांची नावे जाहीर करणे, याप्रमाणे कारवाई करण्यात येणार असल्याचे, मुख्याधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण यांनी सांगितले. तसेच शहराच्या विकासासाठी कर महसूल अत्यंत महत्त्वाचा आहे, या निधीतूनच नागरी सुविधांची कामे केली जातात, त्यामुळे नागरिकांनी कारवाईची वेळ येऊ न देता, आपली थकबाकी भरून नगर परिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन डॉक्टर चव्हाण यांनी केले आहे. ऑनलाइन सुविधा नागरिकांच्या सोयीसाठी कर भरणा करण्याकरता नगर परिषदेत रोख रक्कम क्यू आर कोड आरटीजीएस अथवा एनइएफटी तसेच www.saswasdnagarparishad.org या संकेतस्थळावर ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments