Hot Posts

6/recent/ticker-posts

गौरी समोर साकारले पांडवकालीन सिध्देश्वर मंदिर,साक्षी जगताप यांचा उपक्रम सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: घरचा गौरी गणपती सजावट मध्ये साक्षी संदीप जगताप सासवड यांच्या घरी साकारले सासवडचे पांडवकालीन , सिद्धेश्वर महादेव मंदिराची प्रतिकृती गेले तीन आठवडे स्टेज उभारणीपासून, ते मंदिर बनवणे ,ते शिवलिंग व नंदी शाडू माती पासून विनायक जगताप यांनी बनवले गौराई उभ्या स्वरूपात बसवण्यात आले असून, गणपतीचा बॅकग्राऊंडला सुवर्णप्रभावळ बसवण्यात आलेली आहे ,तसेच देखावेसमोर सिद्धेश्वर महादेवांची महाकाल स्वरूपात पूजा मांडण्यात आलेली आहे संपूर्ण ,देखावा नैसर्गिक स्वरूप कण्यात आलेले असून, वृक्षाची लागवड दाखवण्यात आली असून, त्याचबरोबर माजी वसुंधरा अभियानाची थीम देण्यात आलेली आहे, "झाडे लावा झाडे जगवा "व "पाणी आडवा पाणी जिरवा" सासवड नगर परिषदेच्या स्वच्छ सासवड सुंदर सासवड अभियान राबवण्यात आले आहे, देखावाची संकल्पना संदिप अशोकराव जगताप देखावा बनवण्यात संपूर्ण जगताप कुटुंबीय साक्षी जगताप सिद्धी जगताप, विनायक जगताप ,विक्रांत शिंदे, निलम शिंदे यांचा मोलाचा वाटा आहे. गणेश भक्तांना देखावा पाहण्यासाठी अनंत चतुर्दशी पर्यंत ठेवण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments