पुरंदर मधील शाळांना मिळाले मुख्याध्यापक सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: संच माहितीनुसार 150 विद्यार्थी पट असलेल्या, शाळांना शासनाच्या वतीने पात्र मुख्याध्यापक दिले जातात, याच प्रक्रियेतून शासनाच्या वतीने पुरंदर तालुक्यातील सहा शिक्षकांना मुख्याध्यापकपदी पदोन्नति मिळाली आहे, यामुळे तालुक्यातील सहा जिल्हा परिषद शाळांना आता पात्र मुख्याध्यापक मिळणार असल्याची माहिती शिक्षण विस्तार अधिकारी गोविंद लाखे यांनी दिली. मुख्याध्यापकपदी पदोन्नती झालेले शिक्षक गावे शोभा तुकाराम कामठे (बोपगाव), जयश्री रामदास जगताप (भिवरी), संगीता शिंगणे (सुपे खुर्द), श्वेता जगताप (लोणकर) (शिवरी), विशाखा प्रताप मेमाणे (पिंपरी खुर्द), उषा केशव जाधव (निरा नंबर दोन).
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments