पुरंदर तालुक्यात उच्चांकी बाजारभावामुळे सिताफळ उत्पादकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले; सासवड येथील बाजारांमध्ये दोन क्रेट साठी 8400 तर पुरंदर मधील शेतकऱ्यांमध्ये समाधान सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड (ता. पुरंदर) येथील जुनी तहसील कचेरीवरील पोलीस मैदानावर भरत असलेल्या बाजारामध्ये, सीताफळाला शनिवारी (दि. 30 )उच्चांकी बाजार भाव मिळाला आहे ,या बाजारात सीताफळाच्या दोन केरटलाच 8400 असा बाजार भाव मिळाला असून, सासवड येथील बाजारामध्ये वर्षभरातील बाजार भाव असल्याचे ,शेतकरी व व्यापारी यांनी सांगितले आहे ,सध्या सीताफळाला एकंदरीत चांगला बाजार भाव मिळत आहे, पुरंदर तालुक्यामधील शेतकरी समाधानी आहे ,अशी पिसर्वे (ता. पुरंदर) येथील शेतकरी सोपान वायकर यांनी सांगितले आहे ,वायकर यांच्या सीताफळाच्या दोन केरेटला रविवारी (दि. 31 )7500 बाजारभाव मिळाला असून, हा बाजार भाव गेले वर्षभरातील सर्वात अधिक बाजार भाव असल्याचे वायकर यांनी सांगितले आहे, गौरव काळे उर्फ बल्ली यांनी वायकर यांची सीताफळ खरेदी केली असून, शनिवारी (दि. 30 )काळे यांनी शेतकरी संदीप कडलक यांच्या सीताफळाच्या दोन केरेटला 8400 बाजार भाव दिला असल्याचे सांगण्यात सीताफळाचे आले आहे. सीताफळाच्या केरेटला 3000 रुपयापर्यंत भाजारभाव मिळत असून, हंगाम तीन नंबर दर्जेच्या सीताफळाला 700, 800 असा बाजार भाव आहे, दोन महिन्यापासून सीताफळाचा हंगाम सुरू झाला असून, आता बाजारात जी सीताफळ येत आहे ते चांगल्या दर्जाचे आहे, सासवडच्या फळ बाजारामध्ये फळा बरोबर पेरू, डाळींब, अंजीर, पपई या फळांच्याही खरेदीसाठी हे ठिकाण मध्यवर्ती असल्यामुळे, व्यापारी येत असतात ,असे पिंपळे येथील शेतकरी बाळासो पोमण यांनी सांगितले आहे. सिताफळ खरेदीसाठी राजेंद्र पोटे, सुनील जगताप, महेश काळे, शरद काळे ,जालिंदर काळे, गिरीश काळे, भाऊसो जगताप, गुप्ता सिद्धार्थ खेडेकर, अतुल धुमाळ, विशाल तळेकर, आदी व्यापारी तसेच शेतकरी संजय जगताप, कुंडलिक भापकर आदी उपस्थित होते. जुनी तहसील कचेरी येथील पोलीस मैदानावर चिखल होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्यानंतर, बैठक बोलावून त्यांच्या अडचणी समजावून घेत अडचणी दूर केल्या जातील, असे माजी आमदार संजय जगताप यांनी सांगितले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments