भाजपच्या वैद्यकीय आघाडीवर डॉ. सुमित काकडे सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय आघाडीच्या पुणे ग्रामीण दक्षिण जिल्हाध्यक्षपदी पुरंदर तालुक्यातील डॉ. सुमित काकडे यांची नियुक्ती करण्यात आली, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, जिल्हा समन्वयक आमदार राहुल कुल, आणि माजी जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांच्या मान्यतेनुसार भाजप पुणे ग्रामीण दक्षिण विभागाच्या नूतन जिल्हा पदाधिकाऱ्यांची यादी घोषित करण्यात आल्याचे, शेखर वढणे यांनी सांगितले, माजी आमदार संजय जगताप यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. डॉक्टर सुमित काकडे हे जेजुरी येथील आनंदी लाईफ लाईन हॉस्पिटल आणि आनंदी को ऑफ हॉस्पिटलचे संचालक आहेत, या व्यतिरिक्त ते ग्रामीण संस्था या सामाजिक संस्थेचे ही संचालक आहेत, या व्यतिरिक कोरोना महामारीच्या काळात त्यांनी या संस्थेच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले होते, पुरंदर मेडिकल असोसिएशनचे ते सचिव असून, रोटरी क्लब ऑफ पुरंदरचे माजी अध्यक्ष आणि सध्याचे संचालक म्हणून माहिती कार्यरत आहेत.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments