जय मल्हार क्रांती संघटना जिल्हा उपाध्यक्षपदी अमोल चव्हाण सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: महाराष्ट्र राज्य जय मल्हार क्रांती संघटनेच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी राजुरी (ता. पुरंदर )येथील अमोल बबन चव्हाण यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांच्या हस्ते अमोल चव्हाण यांना नियुक्तीपत्र देण्यात आले, महाराष्ट्रातील बेरड, बेडर रामोशी बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी व समाजाचे रूण फेडण्यासाठी दौलत नाना शितोळे यांनी त्यांना संधी दिल्याचे अमोल चव्हाण यांनी निवडीनंतर सांगितले. संघटनेची वाढ करण्यासोबत व्यावसायिक युवा उद्योजक घडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे चव्हाण यांनी प्रतिनिधीला ही माहिती दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments