वाघिरे अजिंक्यपद स्पर्धा मनिषा जगदाळे यांना निर्विवाद विजेतेपद सासवड प्रतिनिधी: पुणे शिक्षण मंडळाचे, वाघिरे महाविद्यालय सासव ड येथे सुरू असलेल्या महाविद्यालयीन प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांच्या टेबल टेनिस स्पर्धेत प्रा.मनिषा जगदाळे यांनी प्राध्यापक महिला गटाच्या अंतिम सामन्यात प्रा.पूनम काळे यांचा ११-०६ , ११-०२ असा सरळ दोन सेट मध्ये दणदणीत पराभव करीत वाघिरे महाविद्यालय आयोजित टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या प्राध्यापक महिला गटाच्या करंडकावर आपले नाव कोरले. तसेच तृतीय क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात प्रा.मानसी जोशी यांनी प्रा.सुप्रिया राणे यांचा ११-०८, ११-०८ असा सरळ दोन सेट मध्ये पराभव केला. तत्पूर्वी झालेल्या सामन्यात पहिल्या उपांत्य सामन्या मध्ये पूनम काळे यांनी मानसी जोशी यांचा ११-०९, ०९-११ व ११-०४ असा ०२ विरुद्ध ०१ असा पराभव केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात मनिषा जगदाळे यांनी सुप्रिया राणे यांना ११-०४ व ११-०९ अश्या गुण फरकाने २-० सेटने पराभूत केले. वाघिरे महाविद्यालय आयोजित महाविद्यालयीन प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या सदर स्पर्धा पुढील पूर्ण सप्ताह सुरू राहणार आहेत.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments