Hot Posts

6/recent/ticker-posts

बाल विकास मंदिर शाळेत माजी विद्यार्थ्यांचे रक्षाबंधन सासवड प्रतिनिधी : बहिण भावाच्या प्रेमाचे प्रतीक असलेला सण म्हणजे रक्षाबंधन. या रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून सासवड येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाल विकास मंदिर शाळेत रक्षाबंधन आयोजित केले होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे ही महाराष्ट्रातील एक नामवंत शिक्षण संस्था आहे. शाळेने अनेक गुणवंत विद्यार्थी घडविले आहेत. शाळेचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत. रक्षाबंधन या सणाचे औचित्य साधून रक्षाबंधनाच्या कार्यक्रमासाठी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांना आमंत्रित केले होते. यावेळी , मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनींनी उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांना औक्षण करून राख्या बांधल्या. या विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींना भेटवस्तू देऊन शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. खूप दिवसांनी शाळेत आल्यानंतर माजी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. या कार्यमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक भाऊसो बडधे यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी शाळेत वर्षभर होणाऱ्या उपक्रमांची माहिती उपस्थित माजी विद्यार्थ्यांना दिली, तसेच शाळा विकासासाठी मदतीची अपेक्षा व्यक्त केली. या कार्यक्रमात माणिक शेंडकर यांनी रक्षाबंधन सणाची माहिती दिली. सूत्रसंचालन नरेंद्र महाजन यांनी केले. आभार माधुरी जगताप यांनी मानले.

Post a Comment

0 Comments