जर्मनीच्या "हेंकेल" कंपनीतर्फे म.ए.सो. वाघिरे विद्यालय व एम. ई.एस. इंग्लिश मिडीयम स्कूल प्रशालेत 2000 डस्टबिनचे मोफत वाटप सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: म.ए.सो.वाघीरे व एम. ई.एस. इंग्लिश मिडीयम प्रशालेमध्ये, डॉ. प्रसादजी खंडागळे यांच्या पुढाकाराने "हेंकेल" या कंपनीतर्फे प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना ओला कचरा व सुका कचरा वेगळा करून टाकण्यासाठी वाघिरे विद्यालयातील 750 विद्यार्थी व म.ए.सो. इंग्लिश मीडियम च्या 250 विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन डस्टबिन अशा एकूण 2000 डस्टबिन चे मोफत वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी भूपेश सिंग रीजनल सिक्युरिटी मॅनेजर , डॉ. प्रसाद खंडागळे रिसर्च डेव्हलपमेंट मॅनेजर व त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते. भूपेश सिंग यांनी ओला कचरा व सुका कचरा यातील फरक विद्यार्थ्यांना सांगितला. दैनंदिन जीवनातील खेळ व व्यायाम याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. डॉक्टर प्रसाद खंडागळे सर यांनी एकमेकांविषयी असलेली समरसता, सहकार्याची वृत्ती विद्यार्थ्यांना गोष्टीतून सांगितली. पर्यावरणाच्या रक्षणासाठी ओला कचरा व सुका कचरा यांचे नियोजन किती महत्त्वाचे आहे हे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. या कार्यक्रमासाठी वाघीरे प्रशालेच्या माननीय मुख्याध्यापिका श्रीमती जोग मॅडम, इंग्लिश मीडियम स्कूलच्या माननीय मुख्याध्यापिका कल्पना खांडेकर-नागनूर, वाघीरे प्रशालेचे उप मुख्याध्यापक सुरवसे सर, पर्यवेक्षिका लडकत मॅडम, इंग्लिश मिडीयम च्या पर्यवेक्षिका श्रीमती सरोज मॅडम, उपस्थित होते. कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांना हेंकेल कंपनी मार्फत खाऊ देण्यात आला व कार्यक्रमाची सांगता झाली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments