पुरंदर विमानतळाला भूसंपादनासाठी प्रचंड वेग; 70 हेक्टर जमिनीची मोजणी पूर्ण पहिल्याच दिवशी तीन गावातील मोजणी पूर्ण; असून पाच पथकाद्वारे 25 दिवसांमध्ये पुढील काम प्रशासनामुळे करण्याचे आव्हान आहे; कुंभारवळण या ठिकाणच्या शेतकऱ्यांची फक्त जमीन मोजणीला परवानगी तर विमानतळाला सहमती नाही सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी अखेर जमीन मोजणी सुरुवात येथे झाली असून, एकूण सात गावांपैकी पहिल्या दिवशी अर्थात एखतपुर, मुंजवडी, उदाचीवाडी याठिकाणी शुक्रवारी दि. 26 तीन गावातील सुमारे 70% हेक्टर जमीनीची मोजणी झाली असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी याबाबत माहिती दिली, ही मोजणी करताना शेतकऱ्यांनी सहकार्य करावे ,अशी त्यांनी स्पष्ट केले, 25 दिवसांमध्ये ही मोजणी पूर्ण करण्यास येईल, अशी ही माहिती त्यांनी दिली. यावेळी अपल जिल्हाधिकारी राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी कल्याण पांढरे, उपजिल्हाधिकारी अधिकारी संगीता राजापूरकर, उपजिल्हाधिकारी तथा प्रादेशिक अधिकारी बारामती हनुमंत पाटील, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, व्यवस्थापक मोर्चाचे पुणे भरत शहा, तहसीलदार रूपाली सरनोबत, जिल्हाधिशक भूमी अभिलेख प्रभाकर मुसळे, पुरंदर उपअधीक्षक भूमी अभिलेख स्मिता गौड, उपायुक्त पशुधन विकास अधिकारी अंकुश परिहार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, कार्यकारी अभियंता अनुराधा भंडारी, वरिष्ठ अभियंता पृथ्वीराज फाळके, कार्यकारी अभियंता अशोक शेटे, उपवनसंरक्षक पुणे विभाग महादेव मोहिते, कार्यकारी अभियंता अर्जुन नाडगौडा, तहसीलदार विक्रम राजपूत, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र गौर, तालुका कृषी अधिकारी पुरंदर श्रीधर चव्हाण पोलीस निरीक्षक ऋषींकेश अधिकारी, पोलीस निरीक्षक सहाय्यक दिपक वाकचौरे, वैभव सोनवणेआदी उपस्थित होते. बाधित शेतकऱ्यांच्या मोजणीच्या परवानगीनुसार कुंभारवळण गावातील शेती बागायत क्षेत्र असून, जिरायत क्षेत्र किंचित असल्यामुळे, त्या ठिकाणी विमानतळाच्या संदर्भात फक्त जमीन मोजण्यास सहमती दिली असून, तर विमानतळाला सहमती दिलेली नाही, असे शेतकरी गणेश मोरे यांनी सांगितले. कुंभारवळण, पारगाव, एखतपुर, वनपुरी, उदाचीवाडी, मुंजवडी, खानवडी या सात गावात विमानतळ होणार आहे. पहिल्या टप्प्यात एखतपुर, मुंजवडी आणि उदाची वाडी या तीन गावांमध्ये मोजणी सुरू केली आहे. तर पुरंदर तालुक्यात होत असलेल्या प्रस्तावित विमानतळासाठी जमीन अधिग्रहणासाठी शासनाने आता आणखी एक पाऊल टाकलेले असून, जमीन विमानतळासाठी लागणाऱ्या जमिनी पैकी ज्या शेतकऱ्यांनी जमीन द्यायला परवानगी दिली त्यांचीच शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये मोजणी सुरू करण्यात आलेली आहे. मुंजवडी, एखतपुर आणि उदाची वाडी गावामधून या मोजणीला सुरुवात झालेली आहे, नोकरीची हमी द्यावीत ,आम्ही केवळ मोजणीला परवानगी दिली आहे, विमानतळासाठी जर जमीन घ्यायचीच असेल, तर किमान एकराला तीन कोटी पेक्षा जास्त मोबदला दिला पाहिजे, अशी भूमिका शेतकरी एखतपुर व मुंजवडी येथील शेतकऱ्यांनी घेतलेली आहे, तसेच नाईलाजाने मोजणीसाठी तयार झाल्याचे काही शेतकऱ्यांनीही सांगितले आहे, परंतु सरकारने आम्हाला बेघर किंवा भूमीहीन करू नये ,आम्हाला योग्य मोबदला दिल्यास, पुनर्वसनाची हमी द्यावी, स्थानिक तरुणांना नोकरीची संधी दिल्यास, पुढचा विचार आम्ही शेतकरी नक्की करू, असेही शेतकऱ्यांनी प्रतिनिधीला माहिती दिली, तर कुंभारवळण या ठिकाणचे शेतकरी गणेश काशिनाथ मोरे यांनी गावच्या वतीने स्पष्टपणे सांगितले की, आम्ही जमीन मोजणीसाठी फक्त सहमती दिलेली असून विमानतळाला आमची बागायत क्षेत्र असल्यामुळे परवानगी अजिबात सहमती आम्ही देणार नाही असे स्पष्टपणे ठणकावून गणेश काशिनाथ मोरे यांनी सांगितले.आम्ही जमीन फक्त मोजणीसाठी संमती दिलेली असून आमची बागायत क्षेत्र असल्याने विमानतळ साठी संमती देण्यात येणार नाही.आमची काळी मातीही बागायत क्षेत्र असल्यामुळे, विमानतळाला घेता येत नाही ,तर त्यावर निर्णय हा की, पुढच्या आठवड्यात मुख्यमंत्री यांची भेट घेण्यात येणार आहे जिल्ह्याधिकारी, उपजिल्हाधिकारी ,उपविभागीय अधिकारी,पुरंदरमधील पत्रकार ,तर कुंभारवळण गावातील पाच सदस्य समितीमार्फत भेट होणार आहे यासंदर्भात सवॅ माहितीनुसार पुरंदरच्या पत्रकार यांना ही माहिती दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments