पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी नवदुर्गांचा पुरस्काराने महिलांचा सन्मान सोहळा सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: समाजामध्ये कामाचे मोल, जात, धर्म किंवा पंथाने ठरवलेले जात नसून, त्यासाठी कामावर लोक प्रेम करत असतात, ज्याच्या मागे महिलांचा खंबीर पाठिंबा असतो, त्यांना कोणत्याही कामात अडचण येत नसते असे, गौरवोद्गार परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांनी सांगितले, ते सासवड( ता. पुरंदर) येथील स्वर्गवासी एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानच्या नवदुर्गा पुरस्कार सोहळ्यामध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी प्रतिष्ठान आणि अध्यक्ष संतोष जगताप यांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा करत समाजकार्यात सातत्य ठेवावे, यासोबतच मराठवाड्यात पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहनही करण्यात आले. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सलग चौथ्या वर्षी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांना दामले यांच्या हस्ते नवदुर्गा पुरस्काराने गौरविण्यात आले. सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन येथे हा सोहळा झाला. याप्रसंगी जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर वढणे आदी उपस्थित होते. डॉ.दुर्गाडे आणि वढणे यांनी सुद्धा पुरस्कार महिलांचा गौरव करताना त्यांचे कार्याचे कौतुक करण्यात आले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप यांनी प्रास्ताविकातून प्रतिष्ठांच्या कामाचा आढावा घेत उपस्थित त्यांना समाजकार्यासाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले .सचिव हेमंत ताकवले यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. अर्चना उबाळे यांनी सूत्रसंचालन केले. तर नसरीन अंसारी यांनी मानपत्राचे वाचन केले. यावेळी कुंडलिक मेमाणे, आनंद जगताप, डॉ. राजेश दळवी, विश्वास पानसे, धनंजय जगताप, किरण पुरंदरे, अनिल कदम, संजय जाधव, शरद बोबडे, अशपाक बागवान, संदीप टिळेकर, प्रतिष्ठानचे अंकुश शिवरकर, ऑफिस मधील पुजा मेमाणे (शिदे )यासह तालुक्यातील नागरिक आदी उपस्थित होते.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments