Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील श्रीनाथ म्हस्कोबा चरणी तमाशा कलावंताची पहिली सेवा वीर येथे दोनशे कलावंतांची हजेरी दगडी कासवावर दिवस व रात्री हजेरीचा कार्यक्रम उत्साहात सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: श्रीनाथ म्हस्कोबा व देवी जोगेश्वरी यांच्या शारदीय नवरात्राचा निमित्त वीर तालुका पुरंदर येथे तमाशा कलावंतांचे सहा तापे आले असून, महाराष्ट्रातील 200 पेक्षा अधिक तमाशा कलावंतांनी हजेरी लावली आहे. वयाच्या सोळाव्या वर्षी देवाची चाखरी करायला सुरुवात केली असून, अनेक वर्षापासून ही परंपरा आम्ही जपत आहोत, ज्येष्ठ कलावंत मीरा जावडेकर यांनी सांगितले की, नवरात्र उत्सव देवांची सेवा करून, आशीर्वाद घेऊन वर्षभर आपली कला सादर करून, उपजीविका चालवत असल्याचे, हिराबाई कुडाळकर यांनी सांगितले. नवरात्र उत्सव काळात नऊ दिवस देऊळ वाड्यातील देवांचा छबिना संपल्यावर दगडी कासवावर दिवस व रात्री या हजेरीचा कार्यक्रम सुरू असतो, नवरात्र उत्सवात सकला सादर करणाऱ्या नृत्-यांगनांना तसेच कलाकारांना.गावचे पाटील नेताजी बाबुराव धुमाळ यांच्या वतीने, साडी चोळी व बिदांगी देऊन सन्मानित करण्यात येते, व देवस्थान ट्रस्टच्या वतीने या कलावंतांना शिधा वाटप करण्यात येत असल्याचे, छाया कुडाळकर यांनी सांगितले. देवाला येणारे भाविक दर्शना बरोबरच या कलावंतांच्या कलेला पैसे देऊन, दात देतात वर्षाच्या सुरुवातीला नऊ दिवस वीर येथे मुक्काम करून, श्रीनाथ चरणी आपली कला सादर करतात, देवाने प्रसाद दिल्यावर वर्षभराचे व्यवसायाला बाहेर पडण्याची अशी या कलावंतांची अनेक वर्षांची परंपरा असल्याचे सारिका जावडेकर यांनी सांगितले तर अनेक कलावंत योजनेपासून वंचित जेष्ठ लोक कलावंतांना शासनाच्या वतीने मानधन सुरू आहे, पण अनेक कलावंत योजनेपासून वंचित आहेत, वर्षभर तमाशा कला केंद्र, आर्केस्ट्रा, जागरण, गोंधळ या माध्यमातून आम्ही आपली कला सादर करत असून, यासाठी गावोगावी फिरावे लागते, अशा वेळी मुलांच्या शिक्षणाची गैरसोय होत असून ,मुलांसाठी निवासी शाळा सुरू करण्याची मागणी कलावंतांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments