Hot Posts

6/recent/ticker-posts

एकाच मिळकतीचे वेगवेगळ्या प्रकारचे गहाण खत करून घेतल्यामुळे अजित मल्टीस्टेट को ऑफ क्रेडिट सोसायटी व अजित नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संचालक व व्यवस्थापन यांचे विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: शिरूर गणेगाव दुमाला येथील रहिवासी सचिन गरुड व इतर यांनी व्यवसायासाठी अजित नागरी सहकारी पतसंस्था यांच्याकडे सन 2019 मध्ये रक्कम 40 व 25 लाख इतक्या कर्जाची मागणी केली होती, त्यापूर्वी सन 2015 मध्ये फिर्यादी यांनी अजित मल्टीस्टेट सहकारी पतसंस्था यांच्याकडून कर्ज मिळवले होते व त्यांच्या व्यवसायाच्या वृध्दीसाठी सदरचे कर्ज प्रकरण अजित नागरी पतसंस्था यांच्याकडे केली होती, सदर आरोपी यांनी कर्ज प्रकरण दाखल करण्यापूर्वीच कर्ज मंजुरी करून, सदर कर्जासाठी फिर्यादी यांच्याकडून तीन वेळा गणेगाव दुमाला येथील गट नंबर 181/4 या मिळकतीचे गहाण खत करून घेतले आहे, परंतु सदर पतसंस्थेने प्रत्यक्ष करण्याची रक्कम फिर्यादी यांचे "यशराज ऍग्रो फ्रुट्स" च्या आंध्रा बँक शाखा हडपसर या खात्यामध्ये वर्ग करून, असे सांगितले परंतु, सदर फिर्यादी यांनी वेळोवेळी आरोपी यांच्याकडे जाऊन, मागणी केली असता अजून काही कागदपत्रांची कारवाई बाकी असून, ती पूर्ण झाली की, कर्जाची रक्कम जमा होईल, असे सांगितले, त्यामुळे सदर फिर्यादी यांना कर्जाची रक्कम मिळाली नसल्यामुळे, सदरचे कर्ज प्रकरण रद्द झाले असे वाटल्यामुळे फियॅदी यांनी परत चौकशी केली नाही. त्यानंतर माननीय तहसीलदार दौंड यांनी सन 2023 मध्ये महाराष्ट्र को-ऑप सोसायटी एक ची कलम 107 अंतर्गत ताबा मिळवण्याबाबतची नोटीस दिली, त्यावेळी सदर फिर्यादी यांना सदर कर्ज प्रकरणाबाबत समजले, त्यानंतर सदर फिर्यादी यांनी कागदपत्र काढले असता, सदर आरोपी यांनी दुसरे कर्ज प्रकरण मिळून 65 लाखाची कर्ज मंजूर केले होते, परंतु सदर फिर्यादी यांची कोणतीही सही सहमती न घेता, व सदर कर्जाची रक्कम न देता, परस्पर सदरची रक्कम आरोपी नंबर दोन यांचे खात्यात वर्ग केली व आरोपी यांनी संगणमत करून, एकाच मिळकतीचे वेगवेगळ्या पद्धतीने तीन वेळा गहाण खत करून, घेतले त्याचबरोबर सदर आरोपी यांनी सन 2015 ते दोन चेक कर्ज प्रकरण बंद केली नाहीत अजित नागरी पतसंस्था व अजित मल्टीस्टेट को ऑप सोसायटी या दोन्ही पतसंस्थेचे संचालक एकच असून, फिर्यादी यांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने, सदरचे कृत्य केलेले आहे व जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लिमिटेड पुणे यांच्याकडे प्रकरण दाखल करून, खोटा पुरावा देऊन, 101 चा दाखला मिळवून, सदर कर्ज प्रकरणातील जामीनदार महादेव रामभाऊ थोरात यांच्यामुळे गतीचा ताबा मिळविण्याकरिता माननीय तहसीलदार यांच्याकडून पत्र दिलेले आहे ,त्याचबरोबर इतर जामीनदार यांच्या खात्यातून देखील सुमारे चार वर्षापासून रक्कम वसूल करीत आहेत व त्यांच्या जमिनीचा लिलाव करण्याचा प्रयत्न सदर आरोपी करीत आहेत, त्याचबरोबर सदर आरोपी यांनी वेगवेगळ्या निमोशियान इन्स्ट्रुमेंट कायदा कलम 138 प्रमाणे एकविटेशन व कॉन्सिलिटेशन कलम 36 प्रमाणे प्रकरण दाखल केलेली आहेत, अशा प्रकारे सदर आरोपी यांनी संगणमत करून खरेदी यांची फसवणूक केल्याचे समजल्यानंतर सदर फिर्यादी यांनी तक्रार अर्ज सबंधित पोलिसाकडे करून, देखील त्यांनी सदर प्रकरणाची दखल न घेतल्यामुळे, सदर फिर्यादी यांनी मे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी शिरूर यांच्या कोर्टात ॲडव्होकेट सुरेश जाधव, ऍडव्होकेट मनीषा खावडे, एडवोकेट मयूर दरेकर यांनी फियॅदी यांच्यातर्फे सदर प्रकरणाची दखल घेण्याबाबत अर्ज दाखल केला होता, त्यानंतर मे. कोर्टाने सदर प्रकरणात शिरूर पोलिसांना गुन्हा दाखल करून, चौकशी करण्याचा आदेश दिल्यानंतर, शिरूर पोलिसांनी सदर आरोपी एक) अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित तर्फे संस्थापक अशोक कोडिंबा टेकवडे. दोन) सचिव दिलीप नारायण वेल्हेकर. तीन) खजिनदार बाळासो माणिक काळे. चार) अजित मल्टीस्टेट को ऑफ क्रेडिट सोसायटी तर्फे संस्थापक अशोक कोंडीबा टेकवडे. पाच) अजिंक्य अशोक टेकवडे. सहा) विजया अशोक टेकवडे. सात) दिनेश श्रीकांत घोणे. आठ) भूषण सुभाष गायकवाड. नव) सतीश महादेव जाधव. दहा) प्रदीप दिगंबर जगताप. अकरा) गणेश अंकुश जगताप यांच्या विरुद्ध मा.द.वी कलम 406, 420 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला असून ,सदर प्रकरणाची चौकशी चालू आहे, संदेश केंजाळे पोलीस निरीक्षक शिरूर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हवालदार रमेश कदम हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments