Hot Posts

6/recent/ticker-posts

श्रीगोंद्याचे ९ तायक्वांदो खेळाडू विभागस्तरावर .संजय आनंदकर स्पोर्ट्स अकॅडमीचे जिल्हास्तर तायक्वांदो स्पर्धेत यश सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल, वाडिया पार्क अहिल्यानगर येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो क्रीडा स्पर्धेत येथील "संजय आनंदकर स्पोर्ट्स अकॅडमी" च्या खेळाडूंनी ९ सुवर्ण, २ रौप्य, ९ कांस्यपदके मिळवून घवघवीत यश संपादन केले.सुवर्णपदक विजेते ऋतिका दातीर, वैष्णवी चौधरी, गायत्री भुजबळ, शर्वरी गोलांडे, सोफिया शेख, प्राजक्ता तरटे, ओंकार ननवरे, वरद काळे, प्रणव रायकर हे खेळाडू "पुणे विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत" अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील.स्पर्धेमध्ये भार्गवी शेलार, यश खाकाळ यांनी रौप्यपदक तर योगेश्वरी नरके, आर्या गाडगे, भार्गवी सोनवणे, ज्ञानेश्वरी खेडकर, सिया कोकणे, आर्यन शिंदे , अर्णव वाघ, राज कोल्हे, कृष्णा खेडकर यांनी कांस्यपदक पटकावले.विजेत्या खेळाडूंना अकॅडमीचे प्रशिक्षक तथा राष्ट्रीय तायक्वांदो पंच मास्टर जयेश आणि सिद्धेश आनंदकर यांचे मार्गदर्शन लाभले.विभागीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल यशस्वितांचे आमदार विक्रमसिंह पाचपुते, ज्येष्ठ नेते घन:शाम अण्णा शेलार, बाबासाहेब भोस, राजेंद्र दादा नागवडे, मा.आमदार राहुल दादा जगताप, अहिल्यानगर जिल्हा अमॅच्युअर तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष ग्रँडमास्टर संजय आनंदकर, तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष सचिन जामदार यांच्यासह सर्व कार्यकारिणी सदस्य, पालक यांनी अभिनंदन केले.चौकटतायक्वांदो खेळ स्वसंरक्षणासाठी महत्त्वाचा तर आहेच तसेच महाराष्ट्र शासनाने नुकत्याच पारित केलेल्या परिपत्रकानुसार शालेय तायक्वांदो खेळाच्या राज्य तसेच राष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूंना शासकीय नोकर भरतीत पाच टक्के आरक्षण देण्यात आल्याने खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे ग्रँडमास्टर संजय आनंदकर यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments