Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील सासवड सुपा रस्त्याची अक्षरशा: चाळण सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील पूर्व भाग म्हणजेच मुख्य बाजारपेठेला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा सासवड सुपा रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे, मूळचा सुस्थितीत असलेला रस्ता उखडून, टाकायचा सापडेल तशी माती राडारोड रस्त्यावर टाकायची व रस्त्याच्या बाजूची वेळ खाऊपणा, तातडीची गरज नसलेल्या कठड्यांची बांधकामे करायची, असे प्रकार सुरू असून, त्यामुळे स्थानिक शेतकरी नागरिक व प्रवाशांना जीव मुठीत धरून, प्रवास करावा लागत आहे. नियोजन वहीच्या शेतीच्या अभावामुळे, ठेकेदार काम सुरू करत नाही,तर शासकीय यंत्रणा ठिप आहे, हालत नाहीत, दाद मागायची कुणाकडे? असा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे ,दोन महिन्यापूर्वी पारगाव गावठाण ते खानवडी फुले पाटीपर्यंतचा सुस्थितीतील रस्ता नवीन कामासाठी उखडून टाकला आहे, उपलब्ध माती रस्त्यावर पागवण्यात आली आहे, सततचा पाऊस पडत असल्यामुळे, रस्त्यावर राडारोड पसरला आहे ,त्यामुळे वाहने घसरून ,अपघात होत आहेत, त्यामुळे या रस्त्याचे काम तातडीने करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.याच रस्त्यावर काही दिवसापूर्वी पावसाच्या पाण्याचे निचरासाठी नलिका टाकण्यात येत होत्या, दक्षता फलक नसल्याने व अडसर निर्माण न केल्याने, एका परप्रांतीय दुचाकी स्वराचा मृत्यू झाला होता, पुरंदरचे विमानतळासाठी जमिनीची सहमती मिळवण्यासाठी असंख्य अधिकारी या रस्त्याने ये जा करतात, सुमारे 350 कोटी रुपये खर्च होणाऱ्या एमएस आयडीसीच्या रस्त्याच्या दुरुस्तीबद्दल कोणीही शब्द बोलत नाहीत, पुरंदर तालुक्याचे विद्यमान आमदार यावर काही भाष्य करण्यास तयार नाहीत, तर जनतेने न्याय कुणाकडे मागायचा, यासाठी प्रामुख्याने पुरंदर तालुक्यातील सासवड सुपा रस्त्यावरील नागरिकांनी जर न्याय मागायचा असेल तर फक्त उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांचे मुख्य राजपथ इन्फा कंपनीचे मालक जगदीश कदम यांच्याकडे न्याय माघावाच कारण राजपथ इन्फ्रा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे न्याय मागण्यात काही अर्थ नाही ,ते कुणालाही एकतर पुरंदर तालुक्यातील सामान्य नागरिक, सरपंच यांना दाद देत नाहीत, अनेक तक्रारी करून, ठेकेदार काम सुरू करत नाही, त्यामुळे कोणी "न्याय देता का न्याय "असे म्हणण्याची वेळ ही प्रवाशावर आलेली आहे. गौण खनिजाचा तुटावडा आहे, त्यातच रॉयल्टी परवानगी क्षेत्र धारकांच्या परवानगीसाठी वेळ लागत आहे, याबाबत प्रयत्न सुरू असून, दसरा, दिवाळीनंतर सर्वसामग्रीनुसार यंत्रणा राबवली जाणार आहे. डिसेंबर पूर्वी काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे, असे सर्व स्तरातून सहकार्य अपेक्षित आहे. रोहिदास पिसाळ, ठेकेदारांचे मुख्य समन्वयक राजपथ इन्फा कंपनी.

Post a Comment

0 Comments