पुरंदर तालुक्यातील वीर या ठिकाणी पारंपारिक धार्मिक विधी द्वारे घटस्थापना स्थापन सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: महाराष्ट्रातील दक्षिणकाशी म्हणून, प्रसिद्ध असणारे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्री शेत्र वीर (ता. पुरंदर) येथील काशीकंट काळभैरवनाथाचे जागृत अवतार श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरीचा नवरात्र उत्साहातील गट बसविण्याचा कार्यक्रम पारंपारिक व धार्मिक विधी द्वारे उत्साहात आणि भक्तीमय वातावरणामध्ये संपन्न झाला, यावेळी देवस्थानचे मुकादम पाटील, मानकरी, साल करी, दागिनदार, विश्वस्त, उपवासकरी, ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते. श्री शेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरीची यात्रा जशी महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे, यात्रेप्रमाणेच या नवरात्र उत्सव काळातही महाराष्ट्रासह इतर राज्यातून उत्सव काळातही सकाळी पारायण, दुपारी देवाचा छबिना व दुपारनंतर श्रीनाथाच्या सेविका नर्तिका यांचा वाद वृद्धासहित नाच गाण्याचा मनोरंजन चा कार्यक्रम, संध्याकाळी सात नंतर देवाचे धनगरी ओव्या, तर रात्री साडेनऊ वाजता देवाची आरती झाल्यानंतर, छबिना व पुन्हा एकदा रात्रीपासून पहाटेपर्यंत देवाच्या निर्तिकींचा मनोरंजनाचा कार्यक्रम असतो, त्यामुळे महाराष्ट्रातून भाविक भक्त, हौसे,नवसे, गौसे यांनी मंदिर आणि मंदिर परिसरातील फुलून गेलेला असतो, श्रीनाथ जोगेश्वरी नवरात्र उत्सवातील पारंपारिक कार्यक्रम: तिसरी माळ बुधवार दि. 24, कमळाजी भक्त भेटीसाठी देवाची पालखी माळावर जाते, महाष्टमी उपवास मंगळवार दि. 30 भक्ती शक्ती संगम भक्तराज कमळाजी व देवाची माळावर भेट,घट उठवणे बुधवार दि. सकाळी नऊ वाजता, विजयादशमी गुरुवार (दि. 2) देवाची पालखी सिमोलंघनास साडेचार वाजता निघते, नवरात्रीनिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई, करण्यात आली असून, मंदिर व परिसरातील साफसफाई, स्वच्छता, याबाबत मंदिर प्रशासन मागील दोन आठवडे कार्यरत आहे, मंदिरातील सर्व धार्मिक व पारंपारिक विधींचे नियोजन काटेकोरपणे करण्यात आले असून, नवरात्र उत्सवानिमित्त मंदिर स्वच्छता, पिण्याचे पाणी, दर्शन बारी, स्वयंसेवक, होमगार्ड यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे, या व्यतिरिक्त पोलीस बंदोबस्तासाठी प्रशासनाशी पत्रव्यवहार केलेला आहे, मंदिरातील ज्ञानेश्वरी पारायण, कीर्तन याबाबत सर्व नियोजन ट्रस्टचे सर्व विश्वस्त, सल्लागार मंडळ, सर्वांच्या सहकार्याने पूर्ण करत आहे. राजेंद्र धुमाळ देवस्थान ट्रस्ट वीर अध्यक्ष देवस्थान. विश्वस्त सुनील धुमाळ, काशिनाथ धुमाळ, विराज धुमाळ, प्रमिला देशमुख, श्रीकांत थेटे, अमोल धोंडीबा धुमाळ, बाळासो समगीर, जयवंत सोनवणे, तसेच इतर विश्वस्त, सल्लागार ज्ञानेश्वर धुमाळ यांनी ट्रस्ट मार्फत व्यवस्था पाहिली आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments