श्रीक्षेत्र वीर येथे श्रीनाथांच्या भक्त भेटीचा उत्सव (महाष्टमी) सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: क्षेत्र वीर येथे नवरात्र उत्सवानिमित्त अष्टमीचे औचित्य साधून श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व आई जोगेश्वरी यांच्या मूर्तींना रिठ्याच्या पानाचे अलंकार घालीत पूजा करण्यात आली.दुपारी १२ वाजता देवाच्या पालखीच्या वस्त्र परिधान केलेल्या मानाच्या काठ्यांसह सर्व भाविक भक्त, दागीनदार, ग्रामस्थ यांच्या लवाजम्यासह श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांची पालखी भक्त कमळाजी भेटीला माळावर गेली. श्रीनाथांची पालखी काठ्या ढोल नगाराच्या आवाजात भक्त कमळाची मंदिर येथे भेटा-भेट झाली. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.श्रीक्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर हे आपल्या परंपरा व संस्कृतीचे दर्शन घडवत आलेले आहे. यामुळे सर्व विधी व नवरात्रोत्सवातील चालीरीती, प्रथा, परंपरा अविरत चालाव्यात यासाठी विश्वस्त मंडळ सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, असे देवस्थान ट्रस्टमार्फत सांगण्यात आले. मंगळवार पहाटपूजा होऊन मंदिराचा मुख्य गाभारा बंद करण्यात आला सकाळी ६ वाजता मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुला करण्यात आला. आज श्रीनाथ व आई जोगेश्वरी यांना रीठ्याच्या पानाची अलंकार व पूजा घातल्यामुळे श्रीनाथांचे रूप उजळून आले होते. फुलामाळी यांनी रिठ्याच्या पानाची व्यवस्था केली होती. सोनार दिक्षित परिवार, गुरव मंडळींनी अलंकार सजवला. सायंकाळी नेताजीआबा धुमाळ (वाडकर) यांचेमार्फत मानाचा साडी वाटपाचा कार्यक्रम होतो. अनेक रिवाज हे पूर्वापार चालत आले असून पुढेही चालवले जात आहेत. दुपारी १२ वाजता धुपारती होऊन फुलांनी सजलेल्या पालखीत श्रीनाथ म्हस्कोबा व देवी जोगेश्वरी यांचे उत्सव मूर्ती पालखीत ठेवून पालखीची छबिण्यासह एक मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करून, पालखी भक्त भेटीसाठी कमळाजी मंदिर माळावर गेली होती. देऊळवाड्यातून पालखी बाहेर जतन पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी वस्त्र परिधान केलेल्या मानाच्या काठ्याच्या फुलासह, रंगीबेरंगी, फुगे, बांधून सजावट केलेल्या काठ्या, पालखी पुढे उपस्थित होत्या. गुलालाची उधळण करत ढोल ताशाच्या गजरात देवाचा छबिना भरला होतानवरात्र उत्सव ८ वी माळ महाष्टमी उपवास यानिमित्त श्रीनाथ मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. सजावटकार “श्रीनाथ फ्लॉवर डेकोरेटर्स” वीर शुभम कुदळे. विश्वस्त मंडळामार्फत भाविकांना पिण्याचे स्वच्छ पाणी, दर्शनबारी, ज्यादा होमगार्ड, स्वयंसेवक मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई (योगदान नाना वाघ, कैलास औसक व बडधे) यांच्याकडून करण्यात आली होती.यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र धुमाळ, उपाध्यक्ष अमोल आ. धुमाळ,सचिव काशिनाथ धुमाळ, विश्वस्त सुनील धुमाळ ,विराज मोहनराव धुमाळ , अमोल धोंडीबा धुमाळ ,बाळासो समगीर, श्रीकांत थिटे, प्रमिला देशमुख, जयवंत सोनवणे उपस्थित होते.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments