उपविभागीय अधिकारी पुरंदर वर्षा लांडगे व भूमी अभिलेख अधिकारी स्मिता गौड यांचे कार्य कौतुकास्पद सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर उपविभागीय अधिकारी पुरंदर यांनी कामाचा सपाटा लावला आहे, पुरंदर तालुक्यात अनेक प्रकारचे प्रकल्प राबवताना प्रशासनाला सोबत घेत वाघिणीसारख्या काम करणाऱ्या प्रशासकीय अधिकारी म्हणजेच उपविभागीय अधिकारी (प्रांत) वर्षा लांडगे व भूमी अभिलेख अधिकारी स्मिता गौड पुरंदर तालुक्यात आल्यानंतर त्या तालुक्यांची प्रशासकीय सेवा बजावत आहे, ती प्रशासकीय अधिकाऱ्यातील कर्तव्यदक्षता व जनसामान्य प्रति माणुसकी यांचा सुरेख मेळ घालणारी अशीच आहे, पुरंदर मध्ये आल्यानंतर नैसर्गिक आपत्तीचे पंचनामे पूर्ण करणे, शासनाला माहिती पुरविणे, नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई वाटप करणे, अशी महत्त्वाची कामे त्यांनी केलेली आहेत, स्वतःच्या जीवाची परवा न करता, त्या प्रशासकीय सेवा बजावताना कुठेही कमी पडताना दिसत नाहीत, गावोगावी उद्भवणाऱ्या समस्या सोडवणे, शासनाच्या माध्यमातून सेवा देणे, इत्यादी कामे अतिशय नियोजन बद्दल रित्या पार पाडत आहेत, विमानतळा सारख्या प्रकल्प राबविताना त्यांच्या सेवेतील अनुभवाची शिदोरी खऱ्या अर्थाने कामाला येताना दिसत आहे. हे सर्व करताना त्यांच्या नेतृत्वाखानाची झलक पहावयास मिळते, अनेक गोष्टीत उपविभागीय अधिकारी पुरंदर वर्षा लांडगे व भूमी अभिलेख अधिकारी स्मिता गौड यांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यांच्या नियंत्रणाखाली पुरंदर प्रशासन चांगले काम करत आहे, पुरंदर मध्ये प्रकल्प राबविताना आयुक्त, जिल्हाधिकारी, तहसीलदार, डीवायएसपी, गटविकास अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस निरीक्षक, पोलीस विभाग, महसूल विभाग, आरोग्य विभाग, पंचायत विभाग, नगरपालिका विभाग, आजी-माजी पदाधिकारी आदींचे सहकार्य त्यांना मिळत आहे, एक अधिकारी असून, पण सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या दृष्टीने त्या तळमळीने काम करीत आहेत, प्रशासकीय सेवेतील कर्तव्य, अध्यक्ष, योद्धा म्हणून उपविभागीय अधिकारी पुरंदर वर्षा लांडगे यांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहेच.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments