Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर मिल्कची रोप्य महोत्सवी वार्षिक सभा शेतकऱ्यांनी नव्या योजनाची घोषणा सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदरच्या शेतकऱ्यांसाठी गेल्या पंचवीस वर्षापासून दुधाला योग्य भाव देणारी आणि सातत्याने दूध संकलन करणारी एकमेव संस्था म्हणून नावलौकिक मिळवलेल्या पुरंदर मिल्क अँड ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड खलदची 25 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्यात उत्साहात पार पडली. या सभेत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक आणि माजी आमदार संजय जगताप यांनी संस्थेच्या भविष्यासाठी अनेक महत्त्वकांक्षी योजना जाहीर केल्या. यावेळी दिवंगत लोकनेते चंदूकाका जगताप यांच्या दूरदृष्टीतून साकारलेले या संस्थेने शेतकऱ्यांच्या जीवनात मोठा बदल घडवला आहे. सभेला संस्थेचे अनेक सभासद उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना संजय जगताप यांनी संस्थेच्या यशस्वी वाटचालीची माहिती दिली, ते म्हणाले पुरंदर मिल्कचे आजपर्यंत एकही दिवस दूध संकलन बंद ठेवले नाही, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, चंदूकाकांनी घालून दिलेल्या आर्थिक शिस्तीमुळेच हे शक्य झाले आहे, संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेताना जगताप यांनी सांगितले की, सध्या पाच हजार आठशे मीटर क्षमतेच्या असलेल्या इग्लू कोल्ड स्टोरेज ची क्षमता आणखी तीन हजार मीटरिंग टन ने वाढवण्यात येणार आहे, तसेच दूध प्रक्रिया केंद्राचेही विस्तारीकरण केले जाणार आहे, शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी लवकरच फार्मर प्रोड्यूसर कंपनीची स्थापना करण्याची घोषणा त्यांनी केली, ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी अधिक चांगला बाजार मिळेल दरवर्षीप्रमाणे सभासदांना लाभांश म्हणून एक किलो तूप वाटप सुरू करण्यात आले आहे, याची किंमत सुमारे 20 लाख रुपये आहे ,तसेच गवळ्यांना एकूण 18 लाखांचा बोनस देण्यात आला आहे, या उपक्रमाचा शुभारंभ संजय जगताप ,यांच्या सहसंचालिका राजवर्धिनी जगताप, संत सोपान काका सहकारी बँकेचे अध्यक्ष रमनिकलाल कोठडीया आणि इतर संचालक मंडळाच्या उपस्थितीत करण्यात आला. यावर्षी संस्थेने दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीतून तसेच पेट्रोल पंप आणि कोल्ड स्टोरेच्या माध्यमातून एकूण 50 कोटी 64 लाख 81 हजार रुपयांचा व्यवसाय केला आहे, संस्थेचे भाग भांडवल पाच कोटी दहा लाख रुपये असून, राखीव निधी 18 कोटी 66 लाखांचा आहे, यंदा संस्थेला सहा लाख 52 हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र मांढरे यांनी सांगितले की, इग्लू कोल्ड स्टोरेज मध्ये विविध फळे, फुले, धान्य आणि पल्प नियंत्रित तापमानात साठवता येतात, ज्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होतो, संचालक विठ्ठल मोकाशी यांनी प्रास्ताविक केले, या बैठकीला संचालक प्रदीप पोमण, मोहन जगताप, पांडुरंग कामठे, अविनाश वाघोले, संजय ताकवले, संजय म. जगताप, शंकर कड, चंद्रशेखर जगताप, विलास जगताप, बाळासो बहिरट यांच्यासह कात्रज डेरीचे उपाध्यक्ष तानाजी जगताप, सुनिता कोलते, संभाजी काळाणे, नीरा मार्केट कमिटीचे सभापती संदीप फडतरे, संचालक देविदास कामठे, मनीषा नाझीरकर, हरिभाऊ फुले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्राचार्य नंदकुमार सागर आणि पुरंदर नागरी चे सर व्यवस्थापक अनिल उरवणे यांनी सूत्रसंचालन केले. कंपनी सेक्रेटरी संतोष जगताप यांनी अहवालाचे वाचन केले. रणजिती जगताप, येशू जाधव, शरद कामठे, वर्षा तावरे ,तुषार खळदकर, प्रतिमा सूर्यवंशी, आदि कर्मचाऱ्यांनी नियोजन केले. संचालक प्रदीप पोमण यांनी सभासदांना 30 सप्टेंबर ते 30 ऑक्टोबर या कालावधीत खळद येथील डेअरी मध्येच तुपाचे वाटप होणार असल्याचे सांगत आभार मानले. यावेळी वार्षिक सभेत संजय जगताप, राजवर्धिनी जगताप आणि संचालक मंडळ आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments