नाझरे कडे पठार ग्रामपंचायतच्या सरपंच पदी अश्विनी रोटे यांची बिनविरोध निवड सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: नाझरे कडे पठार (ता. पुरंदर )येथील ग्रामपंचायतच्या सरपंच पदी अश्विनी तानाजी रोटे यांची बहुमताने निवड ही पुरंदर तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या व राजकारणातील केंद्रबिंदू व शक्तिस्थान मानल्या जाणाऱ्या नाझरे कडे पठार ग्रामपंचायतच्या मनिषा देविदास नाझरकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने, रिक्त झालेल्या पदावर बिनविरोध निवड करण्यात आली, माजी सरपंच मनिषा देविदास नाझीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली, तर रोटे यांचा एकमेव अर्ज आल्याने, मंडल अधिकारी संजय बडधे, तलाठी संतोष होले, ग्रामसेवक प्रमोद खेडेकर यांनी या संदर्भातील सहकार्य केले. तत्कालीन सरपंच मनिषा देविदास नाझिरकर यांनी सर्वांना संधी मिळावी या उद्देशाने आपला राजीनामा दिला आणि त्यानंतर रोटे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे, त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या प्रसंगी पुरंदर तालुक्याचे माजी आमदार संजय जगताप व नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप फडतरे यांच्या हस्ते नूतन सरपंच अश्विनी रोटे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपसरपंच सुनील खारतोडे, माजी उपसरपंच तात्यासो नाझीरकर ,सदस्य मनिषा मोहन नाझीरकर, छाया जालिंदर वायसे, बाळासो मदने ,अश्विनी खैरे, बाळासो नाझीरकर, राजेंद्र रोटे, आबासो नाझीरकर, संजय रोटे, मोहन गाढवे, तंटामुक्ती जयराम रोटे, दगडू नाझीरकर, राहुल नाझीरकर, आकाश नाझीरकर, पुरुषोत्तम रोटे, शहाजी नाझीरकर, धनंजय रोटे, शशिकांत नाझीरकर, सुदर्शन रोटे, शितल नाझीरकर आदी उपस्थित होते. 1958 साली ग्रामपंचायत स्थापन झाली असून, नागरिक हा गावचा मूळ इतिहास म्हणजे रोट्यांची हे गाव असून, गावातील पाणी, वीज, रस्ता ,मूलभूत सुविधासाठी माझ्या पदाच्या कार्यकालमध्ये गावातील सर्वांच्या सहकार्यातून, गावाचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे तसेच शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचून न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने सहकार्य करण्यासाठी त्यांनी एक प्रकारचा संकल्प मांडला असून, सरपंच पदाचा उपयोग त्यासाठी गावच्या सर्वांगीण विकासासाठी करणार असल्याचे नूतन सरपंच अश्विनी तानाजी रोटे यांनी ही सर्व माहिती प्रतिनिधीला दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments