पुरंदर तालुक्यातील झेडेवाडी गावच्या सरपंच पदी अमर झेंडे यांची बिनविरोध निवड सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: झेंडेवाडी (ता. पुरंदर) येथे ग्रामपंचायतीचे सरपंच वंदना शांताराम खटाटे यांनी राजीनामा दिल्यामुळे, रिक्त झालेल्या जागी सरपंच पदी अमर विष्णू झेंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली, असल्याची निवडणूक निर्णय अधिकारी सुहास कांबळे यांनी जाहीर केले. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तलाठी गणेश सुतार, ग्रामसेविका एस. पी. नवले यानी काम पाहिले. माजी कृषी व माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री दादासो जाधवराव व भाजप नेते बाबाराजे जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक बिनविरोध पार पडली. यावेळी उपसरपंच सोनाली संतोष झेंडे, ग्रामपंचायत सदस्य पूनम संतोष झेंडे, शिवाजी सोपान खटाटे, शरद सदाशिव झेंडे, कौशल्य रामदास झेंडे, हे उपस्थित होते. तर यावेळी दिवे गावचे सरपंच रुपेश राऊत, माजी सरपंच गुलाब झेंडे ,योगेश काळे, अमित झेंडे, शिवसेना नेते राजेंद्र झेंडे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष योगेश फडतरे, तात्या सो झेंडे ,बाबुराव गोळे, जिजाबा झेंडे ,शिवाजी झेंडे, संतोष झेंडे, अजित गोळे, मयूर झेंडे, विठ्ठल झेंडे ,समीर झेंडे ,सोमनाथ झेंडे, विकास झेंडे, रमेश झेंडे, चंद्रकांत खटाटे, भाऊसो झेंडे, वडकी गावचे माजी सरपंच उत्तम गायकवाड, महेंद्र चौरे ,सुरेश भोसले, बाळासो साबळे ,पोलीस पाटील सारिका झेंडे, अपेक्षा झेंडे ,शुभम झेंडे आदी उपस्थित होते. तर यावेळी उत्तम गायकवाड, चंद्रकांत खटाटे, माऊली खटाटे, बाबुराव गोळे,कौशल्या झेंडे, रुपेश राऊत, आमित झेंडे ,गुलाब झेंडे ,अजित गोले, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अमर झेंडे यांनी सरपंच पदी निवड जाहीर होताच, गावातील जेष्ठ मंडळी, माजी सरपंच, उपसरपंच सर्वांना सहमतीत घेऊन ,गावचा विकास यापुढे मी माझ्या सरपंच पदाच्या कार्यकालामध्ये करणार असल्याचे, तसेच शासनाच्या असणाऱ्या विविध योजना या तळागाळापर्यंत पोहोचवणार असल्याचे नूतन सरपंच अमर झेंडे यांनी सांगितले.तर भव्य मिरवणूक गावांमधून काढण्यात आली, यावेळी दिवे, झेंडेवाडी पंचक्रोशीतील विविध मान्यवर पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजित गोळे यांनी केले, सूत्रसंचालन सोमनाथ झेंडे यांनी केले ,तर आभार प्रदर्शन भाऊसो झेंडे यांनी मानले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments